Virat- Anushka Viral Video instagram
Sports

Virat- Anushka Viral Video: इशारों इशारों में.. भारत- पाक सामन्यानंतर विरूष्काचा तो Video व्हायरल

Virat Kohli- Anushka Sharma Viral Video: विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Virat Kohli- Anushka Sharma Viral Video:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान या सामन्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एका व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला हा सामना पाहण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मासह, अरिजित सिंग आणि उर्वशी रौतेलासारख्या स्टार्सने हजेरी लावली होती. या सामन्यादरम्यान अनुष्का शर्मा स्टँड्समधून विराट कोहलीला सपोर्ट करताना दिसून आली. दरम्यान सामना झाल्यानंतर विराट कोहली अनुष्का शर्माला काहीतरी इशारा करताना दिसून आला.

व्हिडिओ होतोय व्हायरल..

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराट कोहली स्टँड्समध्ये असलेल्या अनुष्का शर्माला इशारा करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत. काही युजर्सचं असं म्हणणं आहे की, विराट अनुष्काला म्हणतोय तू तिथेच थांब आपण नंतर गाडीने घरी जाऊ. तर दुसऱ्या एका युजरचं म्हणणं आहे की, विराट अनुष्काला घरी जाण्यास सांगतोय. (Latest sports updates)

भारतीय संघाचा विजय..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तानचा डाव अवघ्या १९२ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने ८६ धावांची खेळी करत भारतीय संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : पंढरपुरात रेशन धान्याचा काळाबाजार; शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाड, कारवाईस टाळाटाळ

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा नेस्कोमध्ये होणार

ST Fare Hike : एसटी बसच्या तिकिट दरात मोठी वाढ, दिवाळीआधी सर्वसामान्यांना झटका

Jalgaon : अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; गिरणा नदीच्या पुरात हजारो झाडे जमीनदोस्त, शेतकरी संकटात

Thane To Buldhana Travel: ठाण्यावरुन बुलढाण्याला प्रवास कसा करायचा? रेल्वे, खाजगी बस आणि टॅक्सी जाणून घ्या सर्व मार्ग

SCROLL FOR NEXT