Virat Kohli Anushka Sharma Saam Tv
Sports

Virat-Anushka: अनुष्का शर्मा-विराट कोहली दुसऱ्यांदा बनले आई-बाबा; बाळाचे नाव काय?

Virat Kohli Anushka Sharma : विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत याची माहिती दिलीय. वमिकाच्या छोट्या भावाचं आम्ही स्वागत केलं असं विराटने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

Bharat Jadhav

भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. आज मंगळवारी अनुष्काने एका मुलाला जन्म दिलाय. विराट आणि अनुष्काला आधी एक मुलगी आहे. त्या मुलीचे नाव वामिका आहे. मुलीचं नवा ज्याप्रमाणे आगळवेगळं ठेवलं होतं त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या मुलाचं नाव 'अकाय' असं ठेवलंय. (Latest News)

विराटने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टवर करत आपल्या मुलाचे नाव सांगितलंय. वामिकाच्या भावाचे जगात स्वागत आहे, असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. विराट कोहलीने हे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करताना लिहिले की, सर्वांना सांगताना आनंद होतोय की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही वामिकाचा धाकटा भाऊ 'अकाय' याचे आमच्या घरी स्वागत केल्याचं सांगितलं. विराट कोहलीने गोडी बातमी देताच कमेंट्सचा वर्षाव सुरु झालाय. चाहत्यांनी काही मिनिटांतच कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील दिग्गजांनीही विराट कोहली आणि अनुष्काचं अभिनंदन केलंय.

अकाय नावाचा अर्थ काय?

विराट आणि अनुष्काने आपल्या मुलांची नावं अर्थपूर्ण ठेवली आहेत. त्यांनी आपल्या मुलाचं नाव अकाय असं ठेवलंय. या नावाचा अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. अकाय या नावाचा तुर्कीत अर्थ सांगायचा तर चमकणारा चंद्र असा होतो. वामिकाच्या नावाची अशीच चर्चा रंगली होती. वामिकाच्या नावाचाही एक अर्थ आहे. वामिका म्हणजे दुर्गा देवी. दुर्गा देवीच्या दुसऱ्या रुपाला वामिका म्हटलं जातं.

दरम्यान, जानेवारी २०२१ मध्ये तिने मुलगी वामिकाला जन्म दिला. लग्नानंतर अनुष्का चित्रपटांपासून दूर आहे. २०१८ मध्ये झिरो हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटामध्ये दिसली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT