Virat Kohli and anushka sharma saam tv
Sports

Virat Kohli- Anushka Sharma: विराट अन् अनुष्काने एकमेकांचा नंबर कुठल्या नावाने सेव्ह केलाय? -VIDEO

Virat Kohli Anushka Sharma Mobile Number: नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli's Name In Anushka Sharma Mobile:

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं खुप जुनं नातं आहे. आतापर्यंत असे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत विवाह केला आहे. त्यापैकीच एक म्हणजे कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं कपल.

हे कपल 'विरूष्का' म्हणून ओळखलं जातं. हे जगप्रसिद्ध नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असतं. नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

आपल्या आवडत्या खेळाडूबद्दल किंवा सेलिब्रिटीबद्दल आपल्याला सर्वच काही जाणून घ्यायचं असतं. आपले आवडते खेळाडू फावल्या वेळात काय करतात? आपल्या आवडत्या खेळाडूने आपल्या गर्लफ्रेंडचा किंवा बॉयफ्रेंडचा नंबर कुठल्या नावाने सेव्ह केला आहे? आणि जर तो सेलिब्रिटी विराट कोहली असेल तर जाणून घ्यायची उत्सुकता डबल होऊन जाते.

या नावाने सेव्ह केलाय एकमेकांचा नंबर..

सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात शोचा होस्ट त्यांना विचारतो की तुम्ही दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर कुठल्या नावाने सेव्ह केला आहे? या प्रश्नाचं उत्तर देत विराट कोहली म्हणाला की, 'डार्लिंग'तर या प्रश्नाचे उत्तर देत अनुष्का शर्मा 'पति परमेश्वर' असं म्हणाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

प्रसिद्ध कपल

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी विरूष्का या नावाने प्रसिद्ध आहे. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही राजेशाही थाटात २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. ११ जानेवारी २०२१ रोजी दोघांना कन्यारत्नप्राप्ती झाली होती. तिचं नाव त्यांनी वामिका असं ठेवलं आहे. या कपलने वामिकाला प्रसिद्धी आणि सोशल मीडियापासून दुर ठेवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुठे घोड्यांची शर्यत, कुठे विदेशी मासे; पुण्यातील पेटोपियात नेमकं काय सुरू आहे? VIDEO

प्रसिद्ध मॉडेल बलात्कार प्रकरणात मुंबईतील उद्योजकाला दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Sleep Health : पूर्ण झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतोय? ही आहेत 6 धक्कादायक कारणे!

मराठा आरक्षणाच्या लढ्यात नवा ट्विस्ट! विखे पाटलांसह मनोज जरांगेंनाही घेरलं; थेट राजीनामा...

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील अमेझॉन , बिग बास्केट, डार्क स्टोरवर एफडीएची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT