wrestler vijay chaudhari saam tv
Sports

पंजाबचे अजमेर सिंह चितपट; विजय चौधरींनी पटकाविला कन्हैया केसरी किताब

विशेष म्हणजे कुस्ती स्पर्धा निकाली हाेत नाहीत परंतु कन्हैया केसरी स्पर्धा निकाली झाली.

सचिन अगरवाल

नगर : निघोज येथे झालेल्या कुस्ती (wrestling) स्पर्धेत तीन वेळेस महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) झालेल्या विजय चौधरी (wrestler vijay chaudhari) यांनी पंजाबच्या अजमेर सिंह (ajmer sinh) यांस चितपट करुन कन्हैया केसरीचा (kanhaiya kesari) किताब पटकाविला. यावेळी उपस्थित कुस्ती शाैकिनांनी चाैधरींना खांद्यावर घेत त्यांची आखाड्यातून मिरवणुक काढली. (wrestler viajy chaudhari latest marathi news)

कोरोनामुळे (corona) बंद झालेल्या कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू कर व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीबद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी निघोज येथील युवा उद्योजकांनी एकत्र येत मच्छिंद्र लंके (machindra lanke) यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत राज्यातील मल्लांसह पंजाबहून हिंद केसरी ठरलेले अजमेर सिंह यांनी सहभाग घेतला हाेता. कन्हैया केसरी किताबासाठी विजय चौधरी आणि अजमेर सिंह यांच्यात निकाली कुस्ती झाली. यामध्ये विजय चौधरी विजयी झाले. विजय चौधरी यांना कन्हैया केसरी बहुमान देत चांदीची गदा आणि तीन लाख रुपयांच बक्षीस देण्यात आलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT