Hardik Patil , Vasai , Virar Saam Tv
Sports

Virar News : आर्यनमॅन हार्दीक पाटलांचे दोन नवे साहसी विक्रम; वाचा पाटलांची कामगिरी

हार्दिक यांच्या कामगिरीमुळे विरार-वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली गेली आहे.

चेतन इंगळे

Hardik Patil : विरारचे आयर्नमॅन हार्दिक दयानंद पाटील (Hardik Patil Ironman) यांनी १७ वी ' कॅलिफोर्निया आयर्नमॅन स्पर्धा २०२२' यशस्वीरित्या नुकतीच पुर्ण केली. यात महत्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यामध्येच नेदरलँड देशातील अँमस्टरडॅम येथे पार पडलेली (TCS मॅरेथॉन स्पर्धा) देखील पाटील यांनी एक दोन वेळा नव्हे तर तब्बल नव्यांदा पूर्ण केली आहे. (Hardik Patil Latest Marathi News)

फुल आयर्नमॅन (ironman) ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित ट्रायथलॉन रेस आहे. यात चार किलाे मीटर पोहणे, (180.2 किलाे मीटर) सायकल चालवणे आणि (42.2 किलाे मीटर धावणे) यांचा समावेश असतो. या तिन्ही शर्यती क्रमाने आणि ब्रेकशिवाय पूर्ण करायच्या असतात. सतरा तासांच्या कालावधीत ही आव्हानं सर करावी लागतात.

यापूर्वी वसई तालुक्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून हार्दिक पाटील यांनी ज्युनिअर महाराष्ट्र श्री व सिनियर श्री यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाव कमावले आहे. २०१५ मध्ये पहिल्यांदाच फुल आयर्नमॅनचा किताब पटकावून आर्यनमॅन हार्दिक दयानंद पाटील यांनी आपली घोडदौड सुरु केली होती. (Maharashtra News)

हार्दिक पाटील यांनी चार वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच चार वेळा वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि तीन वेळा एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या विक्रमांच्या नोंदी नोंदविल्या आहेत. हार्दिकने आजवर शिकागो, न्यूयॉर्क, टोकियो, बोस्टन, लंडन, न्यूझीलँड, मेक्सिको, डेन्मार्क, तैवान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात जाऊन स्पर्धा (sports) पूर्ण केल्या आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT