usa twitter
Sports

America vs Oman: 0,0,0,0,0.. 5 फलंदाज शून्यावर बाद, अमेरिकेने मोडला भारताचा 40 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

America Breaks Team India,s 40 Years Old Record: वनडे क्रिकेटमध्ये अमेरिकेने भारतीय संघाचा ४० वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

क्रिकेटच्या मैदानावर अनेक रेकॉर्ड बनवले जातात आणि मोडलेही जातात. काही रेकॉर्ड असे असतात, ज्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. सध्या क्रिकेट विश्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची जोरादार चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे. अमेरिकेने वनडे क्रिकेट खेळताना भारतीय संघाचा ४० वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

अल अमिरातमध्ये आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप लीग स्पर्धेतील सामन्यात अमेरिका आणि ओमान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात अमेरिकेने ओमानचा ५७ धावांनी धुव्वा उडवत रेकॉर्डब्रेकिंग विजय मिळवला.

अमेरिकेने मोडून काढला ४० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

तर झाले असे की, अल अमिरात क्रिकेट ग्राऊंडवर आयसीसी मेन्स क्रिकेट लीग -२ चा सामना अमेरिका आणि ओमान यांच्यात रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात धावांचा बचाव करताना, सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वीरित्या बचाव करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

या सामन्याता ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर अमेरिकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा डाव १२२ धावांवर आटोपला. हा टी-२० नसून वनडे सामना होता. या सामन्यात अमेरिकेच्या कुठल्याही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही.

या सामन्यात फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. पण गोलंदाजांनी शानदार कामगिरी केल्यानंतर अमेरिकेने या सामन्यात दमदार कमबॅक केलं. अमेरिकेच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर ओमानचा डाव अवघ्या ६५ धावांवर आटोपला. यासह अमेरिकेने हा सामना ५७ धावांनी आपल्या नावावर केला.

या सामन्यात गोलंदाजी करताना ६१ षटक फेकली गेली, हे सर्व चेंडू फिरकी गोलंदाजांनी टाकले. यावेळी एकाही वेगवान गोलंदाजाला संधी दिली गेली नाही. यादरम्यान ५ फलंदाज शून्यावर माघारी परतले. संपूर्ण सामन्यात १९ गडी फिरकी गोलदाजांनी बाद केले. तर १ फलंदाज धावबाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी का जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT