उर्विल पटेलकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतक
चेन्नईच्या उर्विलची लखनौविरोधात आक्रमक खेळी
उर्विल फलंदाजीची जोरदार चर्चा
आयपीएलच्या इतिहासात उर्विल पटेलने इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक इतिहास रचलं आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या विरोधात १३ चेंडूत पन्नास धावा करत इतिहास रचला आहे. त्याने सर्वाधिक जलद अर्धशतक ठोकणाऱ्या यशस्वी जायस्वालची बरोबरी केली आहे. उर्विलने पहिल्या ८ चेंडूत ६ षटकार ठोकले. तर युवराज सिंगचा १२ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा इतिहास आहे.
उर्विल पटेलने ८ चेंडूत ४२ धावा कुटल्या. उर्विल हा युवराज सिंगचा १२ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मोडण्याची चर्चा होती. पॉवरप्लेनंतर स्ट्रॅटेजिक टाइम आऊट झाला. ४२ धावा झाल्यानंतर पुढील ८ धावा करण्यासाठी ५ चेंडूची गरज लागली. उर्विलने आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा इतिहास रचला.
१३ चेंडू - उर्विल पटेल (CSK)
१४ चेंडू - केएल राहुल (PBKS)
१४ चेंडू - पॅट कमिन्स (KKR)
१४ चेंडू - रोमारियो शेफर्ड (RCB)
१५ चेंडू - युसूफ पठाण (KKR)
आयपीएल २०२६ स्पर्धेमध्ये रविवारी चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौमध्ये सामना झाला. चेन्नईमध्ये सुरू असलेल्या सामन्यात उर्विल पटेलची वादळी खेळी पाहायला मिळाली. उर्विल पटेलने आक्रमक फलंदाजी करत इतिहास रचला. उर्विलने १३ चेंडूत अर्धशतक ठोकलं. तर त्याने २३ चेंडूत ६५ धावांची खेळी खेळली.
उर्विलच्या अर्धशतकाने चेन्नई जिंकली
चेन्नई सुपर किंग्सने अतितटीच्या सामन्यात लखनौला ५ विकेटने पराभूत केलं. चेन्नईने सलग तिसरा सामना जिंकला आहे. उर्विल पटेलने १३ चेंडूत ठोकलेल्या अर्धशतकाच्या जिवावर चेन्नईने २०४ धावांचं आव्हान पूर्ण केलं. चेन्नईने २०१९ सालानंतर पहिल्यांदा १८० धावांहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.