prithvi shaw twitter
Sports

IPL Auction 2025: लिलावात अन्सोल्ड होऊनही हे खेळाडू IPL खेळू शकतात

IPL 2025 Unsold Players List: आयपीएल २०२५ स्पर्धेत अन्सोल्ड राहिलेले खेळाडू अजूनही आयपीएल स्पर्धेत खेळू शकतात

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये पार पडला. या लिलावात १८२ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी फ्रेंचायझींनी ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले. या लिलावात श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर आणि रिषभ पंत या भारतीय खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लागली.

तर एकूण ३९५ खेळाडू अन्सोल्ड राहिले. ज्यात शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र हे खेळाडू अन्सोल्ड राहूनही आयपीएल लिलावात खेळू शकतात.

कशी मिळेल संधी?

या लिलावात अन्सोल्ड राहिलेले खेळाडू आयपीएल २०२५ स्पर्धेत खेळू शकतात. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर त्याच्या जागी अन्सोल्ड राहिलेल्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

नियम काय सांगतो?

सर्वात पहिला नियम म्हणजे, जो खेळाडू रिप्लेसमेंट म्हणून येणार आहे, त्याची बेस प्राईज ही दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूपेक्षा कमी असावी. जर पृथ्वी शॉ ला आयपीएल खेळायचं असेल तर, त्याची बेस प्राईज ७५ लाख रुपये आहे. त्यामुळे दुखापतीमुळे बाहेर होणाऱ्या खेळाडूची बेस प्राईज ही ७५ लाख पेक्षा कमी असावी.

या खेळाडूंना मिळू शकते संधी

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसून आला होता. मात्र या हंगामासाठी त्याला रिटेन करण्यात आलेलं नाही. त्याची बेस प्राईज २ कोटी रुपये आहे. त्यामुळे २ कोटी बेस प्राईज असलेला खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर वॉर्नरला संधी दिली जाऊ शकते.

पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ ची बेस प्राईज ७५ लाख रुपये होती. गेल्या हंगामात तो दिल्लीकडून खेळताना दिसून आला होता. मात्र या हंगामात दिल्लीने त्याला रिलीज केलं आणि पुन्हा बोली लावलीच नाही.

शार्दुल ठाकूर

चेन्नई सुपर किंग्जने शार्दुल ठाकूरला आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रिटेन केलेलं नाही. त्याची बेस प्राईज २ कोटी रुपये इतकी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हुतात्मा साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून रणकंदन; वैभव नायकवडींच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

Shocking : लग्नाला मुलगी मिळेना, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT