umran malik Twitter
Sports

IPL 2023 WATCH: 'जम्मू एक्स्प्रेस' उमरानचा नादच खुळा! गोळीपेक्षाही वेगवान चेंडू टाकत स्टंपच तोडला -VIDEO

Umran Malik Wicket Video: आयपीएल २०२३ स्पर्धेतील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

IPL 2023 SRH VS RR LIVE: आयपीएल २०२३ स्पर्धेतील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडीयममध्ये सुरु आहे. दरम्यान या सामन्यात उमरान मलिकने टाकलेल्या एका चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना उमरान मलिकने एक भन्नाट गतीने चेंडू टाकून दांडी गुल केल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाची गोलंदाजी सुरु असताना, भुवनेश्वर कुमारने १५ वे षटक टाकण्याची जबाबदारी उमरान मलिकला दिली होती.

या षटकातील पहिलाच चेंडू १४९.३ गतीने टप्पा पडून भन्नाट वेगाने आत आला आणि देवदत्त पडिक्कलची दांडी उडवून गेला. उमरानने टाकलेला चेंडू हा देवदत्त पडिक्कलला पुढे खेळायचा होता. मात्र तो बॅकफूटवर खेळण्यासाठी गेला त्यामुळे त्याचा अंदाज चुकला आणि तो क्लीन बोल्ड झाला. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

सनरायझर्स हैदराबाद:

मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), आदिल रशीद, टी नटराजन, उमरान मलिक, फजलहक फारुकी

राजस्थान रॉयल्स :

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक आणि कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT