Ayan Khan Saam Tv
क्रीडा

T-20 World Cup: विश्वविक्रम मोडला पण जाता-जाता सीमारेषेवर पडला; नेदरलँडच्या अयान खानच्या नावे 'हा' विक्रम

अयान अफजल खान असे या खेळाडूचे नाव असून त्याने आज टी-20 विश्वचषकात पदार्पण केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

T-20 World Cup : टी- 20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने UAE चा तीन विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना UAE ने 111 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेदरलँड संघाने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. मात्र, यूएईचा पराभव होऊनही त्यांच्या एका खेळाडूने विश्वविक्रम रचला आहे. अयान अफजल खान असे या खेळाडूचे नाव असून त्याने आज टी-20 विश्वचषकात पदार्पण केले आहे.

अयान खानचं वय 16 वर्षे 335 दिवस आहे. त्यामुळे तो T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. यात अयान खानने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरला मागे टाकले आहे. आमिरने वयाच्या 17 वर्षे 55 दिवसांत टी-20 विश्वचषकात पदार्पण केले. अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 17 वर्षे 170 दिवस वयात टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळला होता.

आजचा सामना अयान खानसाठी खास नव्हता. फलंदाजीत तो 7 चेंडूत 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. फ्रेड क्लासेनने अयानला टॉन कूपरच्या हाती झेलबाद केले. अयान खान आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना तो सीमारेषेजवळ खाली पडला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर अयान खानने 3 षटकात 15 धावा देऊन एक विकेट घेतली. यूएईसाठी अयान खानचा हा तिसरा टी-20 सामना होता. या तीन सामन्यांमध्ये त्याने 125 च्या स्ट्राईक रेटने 25 धावा करण्याव्यतिरिक्त तीन विकेट्स घेतल्या आहेत. (Cricket News Update)

यूएईने नेदरलॅंडला 112 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करत नेदरलॅंडने तीन विकेट्स राखून यूएई संघाचा पराभव केला. नेदरलॅंडचा कर्णधार स्कॉट एडवर्डने शेवटच्या स्पेलमध्ये 16 धावांची नाबाद खेळी करून नेदरलॅंडला विजय मिळवून दिला. नेदरलॅंडचे सलामीवीर फलंदाज विक्रमजीत सिंग आणि मॅक्सने 33 धावांची खेळी साकारली. मॅक्सने 18 चेंडूत 23 धावा केल्या.

त्याआधी यूएईचे सलामीवीर फलंदाज चिराग सुरी आणि मुहम्मद नसीमने 53 धावंची खेळी साकारली. मुहम्मदन 41 धावांवर खेळत असताना फ्रेड क्लासनेच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर चिरागला धावांचा सूर न गवसल्याने तो अवघ्या 12 धावांवर तंबूत परतला.

नेदरलॅंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळं यूएईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. फ्रेड क्लासेन आणि बास दी लिडे या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. लिडेनं तीन विकेट्स तर क्लासेनला दोन विकेट्स मिळाल्या. तर युएईचा गोलंदाज जुनैद सिद्दीकीने खोचक गोलंदाजी करत नेदरलॅंड संघाच्या तीन फलंदाजांना बाद केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Vidhan Sabha : जळगाव शहरात बंडखोरी करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांचे निलंबन; भाजपकडून कारवाई

Prabhas: 400 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या चित्रपटासह प्रभास 'या' 5 धमाकेदार चित्रपटातून बॉक्स ऑफिसमध्ये घालणार धुमाकूळ

Maharashtra Politics : शिवाजी महाराज काल्पनिक नव्हते, छत्रपती शिवरायांची मंदिरं कशासाठी? संभाजी ब्रिगेडचा ठाम विरोध

Maharashtra Election : दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर! एकमेकांच्या उमेदवारांचे बॅनर फाडले, बोईसरमधील प्रकार

Maharashtra News Live Updates: निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात 280 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT