Sports

U19 World Cup 2024 Final IND vs AUS : भारत- ऑस्ट्रेलियाच्या संघातील अंतिम सामन्याचा थरार कधी अन् कुठं पाहायचा?

U19 World Cup 2024 Final : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील हाय व्होल्ट्रेज सामना भारतीय वेळेनुसार उद्या रविवारी दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. सामना कधी कुठे पाहता येणार हे जाणून घ्या.

Bharat Jadhav

U19 World Cup 2024 Final IND vs AUS :

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघ पुन्हा अंतिम सामन्यात आमने-सामने आले आहेत. अंडर १९च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये भिडत होणार आहे. भारताने यापूर्वी U19 चा वर्ल्डकप हा पाचवेळा जिंकलाय. आता रेकॉर्ड ब्रेक सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्याची संधी उदय सहारणच्या नेतृत्वाखालील संघाला आहे. (Latest News)

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील हाय व्होल्ट्रेज सामना भारतीय वेळेनुसार उद्या रविवारी दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. सामना कधी कुठे पाहता येणार, असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत. भारत -ऑस्ट्रेलिया हा हाय व्होल्टेज फायनल सामना दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्डकप २०२४ ची फायनल ही स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित होईल. भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना हा हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीम होणार आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या (Australia )अखेरच्या गडीने पाकिस्तानच्या (Pakistan) स्वप्नांवर पाणी फेरलं. १८० धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी झाली होती. परंतु अखेरच्या गडीने पाकिस्तानला पराभूत केलं.

२०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाला मिळाली होती हार

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने २०१२ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकअखेर २२५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार उन्मुक्त चंदने शतकी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

SCROLL FOR NEXT