chhatrapati shivajiraje bhosale, satara, badminton, satara sports news saam tv
Sports

Satara News : शिवाजीराजे भाेसलेंच्या स्मृतीप्रित्यर्थ साताऱ्यात रविवारपासून राज्य बॅडमिंटन स्पर्धा

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी ही स्पर्धा आयोजिण्याचा निर्णय घेण्यात आला.

Siddharth Latkar

Satara News : महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे येत्या २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती प्रित्यर्थ दुसरी योनेक्स महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन निवड स्पर्धा (u - 19 state level badminton championship 2022) आयोजिल्याची माहिती सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या सदस्या वृषालीराजे भोसले (vrushaliraje bhosale) यांनी दिली. ही स्पर्धा १९ वर्षांखालील गटात असून स्पर्धेत महाराष्ट्रातील ३५० हून अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याचे भाेसले यांनी नमूद केले. (satara latest sports news)

वृषालीराजे म्हणाल्या दुसरी योनेक्स (yonex) महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन निवड स्पर्धा सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष आणि राज्य बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी आयोजित करण्याचा निर्णय ऑगस्ट २०२२ मध्ये घेतला होता. परंतु दुर्दैवाने त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. (Breaking Marathi News)

त्यानंतर आम्ही सर्वांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी ही स्पर्धा आयोजिण्याचा निर्णय घेतला. उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू, महाराष्ट्र बॅडमिंटन (badminton) संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिल्याने त्यांना हीच योग्य आदरांजली ठरेल असेही वृषालीराजेंनी नमूद केले. त्या म्हणाल्या नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात आयाेजन केले आहे. साताऱ्यात (satara) अशी स्पर्धा व्हावी, यासाठी त्यांनी निर्धार घेतला होता. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे स्वप्न होते ते पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने सातारकर क्रीडाप्रेमींना महाराष्ट्रातील (maharashtra) गुणवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी लाभणार आहे. तसेच नवोदित खेळाडूंना प्रोत्साहनही मिळणार आहे असेही वृषालीराजेंनी नमूद केले. यावेळी ज्येष्ठ क्रीडा संघटक सुरेश साधले, सुधाकर शानभाग, मनोज कान्हेरे आदी उपस्थित हाेेते. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT