IND vs NZ 3rd T20 Updates
IND vs NZ 3rd T20 Updates Saam TV
क्रीडा | IPL

IND vs NZ T20 : तिसऱ्या टी-२० सामन्याआधी हार्दिकने डाव टाकला; टीम इंडियात होणार दोन मोठे बदल

Satish Daud-Patil

IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यांत न्यूझीलंडकडून २१ धावांनी पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यांत न्यूझीलंडवर ६ विकेट्सनी थरारक विजय मिळवला होता.

त्यामुळे तीन सामन्यांची टी-20 मालिका बरोबरीत आली आहे. आता तिसरा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघासाठी करो या मरो असाच असेल. दरम्यान, या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नवा डाव टाकत संघामध्ये दोन मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. (IND vs NZ 3rd T20)

पहिला बदल कोणता होणार?

न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांत टीम इंडियाला (Team India) अपेक्षित अशी सुरुवात मिळालेली नाही. कारण सलामीवीर इशान किशन आणि शुभमन गिल हे दोघेही सपशेल अपयशी ठरले आहेत. वनडे सीरिजमध्ये दमदार फॉर्ममध्ये दिसलेला शुभमन गिल पहिल्या दोन सामन्यांत चांगली कामगिरी करू शकला नाही.

दुसरीकडे इशान किशनची कामगिरी सुद्धा अत्यंत खराब राहिलेली आहे. इशानला गेल्या पाच टी-20 सामन्यांत फक्त 65 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्या पृथ्वी शॉ याला संधी देण्याच्या तयारीत आहे. पण पृथ्वीला संघात स्थान देताना इशान आणि गिल यांच्यापैकी कोणाला संघाबाहेर करायचे, हा निर्णय संघ कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे.

दुसरा बदल कोणता होणार?

टीम इंडियात दुसरा बदल हा गोलंदाजीत होणार असल्याचं कळतंय. दुसऱ्या टी-20 सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी पोषक होती. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याने यजुवेंद्र चहलला संधी दिली होती. आता तिसऱ्या सामन्याची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असले, त्यामुळे युजवेंद्र चहलला संघाबाहेर केले जाऊ शकते.

चहलच्या जागी वेगवाग गोलंदाज उमरान मलिकला संधी मिळू शकते. उमरानकडे अतिरिक्त गती असल्यामुळे तो न्यूझीलंडच्या  (IND vs NZ)  फलंदाजांना चकवा देऊ शकतो. दुसरीकडे चहल बाहेर गेल्यानंतर भारतीय संघात कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडासारखे फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्याची खेळपट्टी पाहता चहलला भारतीय संघात स्थान मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT