india vs pakistan Saam TV
Sports

India vs Pakistan: विराट vs शाहीन! भारत- पाकिस्तान सामन्यात या ५ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

Players To Watch Out In IND vs PAK Match: या खेळाडूंच्या कामगिरीवर असतील सर्वांच्या नजरा.

Ankush Dhavre

Players To Watch Out In IND vs PAK Match:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हे दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडू दमदार खेळ करताना दिसून येतील. दरम्यान ५ असे खेळाडू आहेत ज्यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.

१) विराट कोहली :

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये विराटने वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना त्याने ८५ धावा चोपल्या होत्या.

तर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद ५५ धावा केल्या होत्या. आता पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही त्याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा असणार आहे.

२) रोहित शर्मा:

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा जर फॉर्ममध्ये असेल तर काय करू शकतो हे त्याने गेल्या सामन्यात दाखवून दिलं आहे. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १८१ धावांची तुफानी खेळी केली होती.

या खेळीदरम्यान त्याने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडून काढले होते. तो पाकिस्तानविरुद्ध १८ वनडे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. यादरम्यान त्याने ७८७ धावा केल्या आहेत.

३) जसप्रीत बुमराह :

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह चांगल्या रिदममध्ये आहे. या गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ४ गडी बाद केले होते. आतापर्यंत २ सामन्यांमध्ये त्याने ६ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो भारतीय संघासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. (Latest sports updates)

४) बाबर आझम:

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. मात्र भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात तो दमदार कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. तो नेदरलँडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५ तर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अवघ्या १० धावांवर माघारी परतला होता.

५) शाहीन शाह आफ्रिदी:

डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी भारतीय संघासाठी सुरुवातीच्या काही षटकांमध्ये अडचणी निर्माण करू शकतो. आशिया चषक २०२३ स्पर्धेतील भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने ४ गडी बाद केले होते.

मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत त्याला केवळ २ गडी बाद करता आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, आज खरेदीचा 'गोल्डन चान्स'; 18K, 22K आणि 24K चे दर किती?

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Solapur : नवऱ्याने बायकोला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, एकांतात बोलायचे सांगून खोलीत नेलं, नंतर...

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ कसं जायचं? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT