PV Sindhu चा धमाकेदार विजय; पदकापासून एक पाऊल दूर  Twitter/ @Pvsindhu1
Sports

PV Sindhu चा धमाकेदार विजय; पदकापासून एक पाऊल दूर

पी.व्ही.सिंधूने (PV Sindhu) पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. तिने रँकिंगमध्ये तिच्या पेक्षा वरती असलेल्या यामागुचीचा पराभव केला आहे.

वृत्तसंस्था

टोकियो: पी.व्ही.सिंधूने पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. तिने रँकिंगमध्ये तिच्या पेक्षा वरती असलेल्या यामागुचीचा पराभव केला आहे. PV Sindhu ने आपला पहिला सेट 21-13 ने तर दुसरा सेट 22-20 ने जिंकला. सिंधूने आता सेमिफायनलमध्ये धडक मारली आहे. सिंधू आता पदकापासून एक पाऊल दूर आहे. cरिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती आणि जागतिक विजेती पीव्ही सिंधूने नावाला साजेशी खेळी केली आहे. याआधी गुरुवारी ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या पूर्व उपांत्यपूर्व सामन्यात तिने डेन्मार्कच्या

मिया ब्लिचफेल्डला सरळ गेममध्ये पराभूत करून शेवटच्या आठमध्ये प्रवेश केला होता. मुसाहिनो फॉरेस्ट स्पोर्ट्स प्लाझा येथे झालेल्या सामन्यात सिंधूने मियाचा २१-15, २१-13 असा पराभव केला होता. सहा सामन्यांत सिंधूचा हा पाचवा विजय होता. यावर्षी थायलंड ओपनमध्ये सिंधूला मियाविरुद्धच्या एकमेव पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सिंधूने हा सामना जिंकत भारतीयांच्या आणि चाहत्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. या पुर्वा लोव्हनिनाने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मिराबाई चानूने पदक जिंकत भारतासाठी खाते उघडले होते. आता येत्या काळात ऑलिम्पिकमध्ये भारत कशा पद्धतिने कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवड शहरात पाणीकपात सुरू

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

रक्तातील साखर वाढणार नाही! फक्त या 3 भाज्या खा

पगडीने तोंड दाबलं, हाताची नस कापली, गळा दाबून 7 वर्षांच्या निरागस मुलाची हत्या, भद्रकालीच्या जंगलात नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, आता १४ आमदार फुटणार? शिंदेंच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT