Kane Williamson News Update/Twitter SAAM TV
Sports

Kane Williamson: कर्णधारपद अचानक का सोडलं? केन विलियमसननं सांगितलं कारण...

Kane Williamson Latest Update: न्यूझीलंडच्या केन विलियमसननं कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं. त्यावर स्वतःच स्पष्टीकरण दिलंय.

Nandkumar Joshi

Kane Williamson News Update: न्यूझीलंडच्या केन विलियमसन यानं कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. न्यूझीलंड क्रिकेटनं यासंबंधीचं निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली. विलियमसन हा वनडे आणि टी २० क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिन्ही प्रकारांत खेळण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे.

केन विलियमसन यानं कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर त्यामागचं कारण काय, अशी चर्चा सुरू झाली. त्याचवेळी याबाबत स्वतः विलियमसननं कारण स्पष्ट केलंय. कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचं कर्णधारपद भूषवणं हा विशेष सन्मान आहे. माझ्यासाठी तरी कसोटी हे क्रिकेटचं सर्वोत्तम शिखर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व करताना असलेल्या आव्हानांचा आनंद लुटला आहे. कर्णधारपदावर असताना मैदान आणि मैदानाबाहेरही कामाचा ताण वाढतोय. करिअरच्या या टप्प्यावर हा निर्णय योग्य आहे, असं मला वाटतंय, असं विलियमसन म्हणाला. (Latest Marathi News)

विलियमसन म्हणाला की, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासोबत सल्ला-मसलत केल्यानंतरच पुढील दोन वर्षांत दोन विश्वचषक स्पर्धा होत आहेत. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदी राहणं उचित होईल, असं मला वाटलं. (Sports News)

अनुभवी साउदीकडे जबाबदारी

विलियमसननं कर्णधारपद सोडल्यानंतर अनुभवी खेळाडू टीम साउदी याच्याकडे कसोटी क्रिकेट संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. तर टॉम लॅथम याच्याकडे उपकर्णधारपद सोपवलं आहे. साउदी याच महिन्यात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारे कर्णधारपद सांभाळणार आहे. साउदीनं ३४६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधीत्व केले आहे. तर २२ टी २० सामन्यांत संघाचं नेतृत्व केलं आहे. साउदी हा न्यूझीलंडचा ३१ वा कसोटी कर्णधार असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT