बुलढाण्यातील क्रिकेट प्रशिक्षकाची क्रिकेट साहित्याने वजन तुला करत केला सन्मान संजय जाधव
Sports

बुलढाण्यातील क्रिकेट प्रशिक्षकाची क्रिकेट साहित्याने वजन तुला करत केला सन्मान

खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन तयार करणाऱ्या संजय देवल या प्रशिक्षकाचा आज वाढदिवस असल्याने भारत विद्यालयामध्ये त्यांची क्रिकेट साहित्याने तुला करून सन्मान करण्यात आला.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : क्रिकेट खेळामध्ये भारत विद्यालयाच्या खेळाडूने राज्यासह देशात आपला अप्रतिम खेळ दाखवून यश मिळवले, आणि या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन तयार करणाऱ्या संजय देवल या प्रशिक्षकाचा आज वाढदिवस असल्याने भारत विद्यालयामध्ये त्यांची क्रिकेट साहित्याने तुला करून सन्मान करण्यात आला.

हे देखील पहा -

बुलडाणा शहरातील भारत विद्यालयातील क्रिकेटचे प्रशिक्षक संजय देवल यांनी अथक परिश्रमातून अनेक खेळाडू घडवले. यामध्ये 508 विद्यार्थी राज्य स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी 50 राष्ट्रीय खेळाडू आहेत, तर भारत विद्यालयाचे 32 संघ हे तर राज्यस्तरावर खेळलेले आहेत. ज्यामध्ये 3 खेळाडू हे रणजी देखील खेळले आहेत आणि एक खेळाडू हा आयपीएलमध्ये देखील क्रिकेट खेळलेला आहे.

त्यामुळे जिल्ह्यासह राज्याला उत्कृष्ट खेळाडू निर्माण करणाऱ्या प्रशिक्षकाचा आज त्यांच्या वाढदिवशी क्रिकेट साहित्याने तुला करून त्यांचा सन्मान करण्यात आला. मुलांना यापुढे देखील मोबाईल आणि टीव्ही पासून दूर ठेवत प्रत्यक्ष मैदानी खेळावर भर देऊन त्यांच्या मनात खेळांविषयी उत्सुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी प्रशिक्षक संजय देवल यांनी सांगितले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT