WTC Points Table saam tv
Sports

WTC Points Table: ...तर टीम इंडियाचं होणार मोठं नुकसान; पाकिस्तानच्या विजयामुळे WTC च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल

WTC Points Table: पाकिस्तानच्या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलचं गणित बिघडलं आहे. या विजयासोबत पाकिस्तानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एकीकडे भारत विरूद्ध न्यूझीलंड तर दुसरीकडे पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये ३ सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. शुक्रवारी पाकिस्तानने या सिरीजमधील पहिल्या टेस्ट सामन्याचा वचपा काढत इंग्लंडचा पराभव केला. पाकिस्तानच्या या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलचं गणित बिघडलं आहे. याशिवाय न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास टीम इंडियाचं कसं नुकसान होणार आहे, याची देखील माहिती घेऊया.

पाकिस्तानातील मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने दीर्घकाळानंतर आपल्या घरात विजय मिळवला. यावेळी पाकिस्तानच्या टीमने १३३८ दिवसांनंतर मायदेशात टेस्ट फॉर्मेटमध्ये विजय मिळवला. पाकिस्तानने इंग्लंडच्या टीमचा १५२ रन्सने पराभव केला. या विजयासोबत पाकिस्तानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.

WTC Points Table मध्ये पाकिस्तानचा

३ सामन्यांच्या या सिरीजमध्ये पाकिस्तानने आता १-१ अशी बरोबरी साधली आहे. विजयापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम ९ व्या स्थानावर होती, मात्र आता पाकिस्तान ८ व्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत पाकिस्तान पीसीटी 16.670 होता, जो आता 25.92 पर्यंत वाढलाय.

पराभवामुळे इंग्लंडचं मोठं नुकसान

WTC 2025 चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार असून या पराभवामुळे इंग्लंडला अंतिम फेरी गाठणं काहीसं कठीण दिसतंय. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडचं १२ पॉईंट्सचं नुकसान झालंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये इंग्लंडची टीम २८ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडविरूद्ध भारताचा पराभव झाला तर...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये सध्या टीम इंडिया ९८ पॉईंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाची टीम दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या टीम इंडिया बंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला टेस्ट सामना खेळत असून भारत पराभवाच्या छायेत आहे. अशामध्ये जर टीम इंडियाचा पराभव झाला तर पॉईंट्स टेबलमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT