indian test cricket team yandex
Sports

IND vs BAN: केएल राहुलची सुट्टी, रिषभ पंतचं कमबॅक! बांगलादेशविरुद्ध या खेळाडूंना मिळू शकते संधी

Team India Squad For IND vs BAN Test Series: येत्या काही दिवसात भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दोन्ही संघामध्ये १९ सप्टेंबरपासून २ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्यानंतर ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच घोषणा केली जाणार आहे. या मालिकेसाठी कोणाला संधी मिळणार? आणि कोण बाहेर राहणार? जाणून घ्या.

हा खेळाडू करणार कमबॅक

भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याने २०२२ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो कसोटी क्रिकेट खेळताना दिसून आलेला नाही.

दरम्यान दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याने अवघ्या ४७ चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली आहे. या खेळीसह त्याने संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. तर पंतच्या शानदार खेळीमुळे केएल राहुलचा संघातून पत्ता कट होऊ शकतो.

भारतीय संघाचं टेन्शन वाढणार?

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळू शकते. कारण नुकताच बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा सुपडा साफ केला आहे. त्यामुळे बांगलादेश या मालिकेतही पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकते. भारतीय संघ या मालिकेसाठी ४ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. त्यामुळे अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, आर आश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात संधी दिली जाऊ शकते.

या मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रविंद्र जड़ेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT