team india  twitter
Sports

IND vs BAN: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा! Rishabh Pantचं कमबॅक, तर या प्रमुख गोलंदाजाला बसवलं

Team India Squad For IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला येत्या १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. दरम्यान या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेतून विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्याची या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तर रिंकू सिंगने ज्याला ५ षटकार मारले त्या यश दयालचा देखील भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेशला आव्हान देण्यासाठी बीसीसीआयने १६ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली आहे. हा संघ पहिला कसोटी सामना खेळताना दिसून येणार आहे. हा सामना १९ सप्टेंबरला सुरू होईल. त्यानंतर २७ सप्टेंबरपासून दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठीही लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाईल. कसोटी मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका देखील रंगणार आहे. या मालिकेसाठीही लवकरच संघ निवडला जाणार आहे.

मालिकेतील पहिला सामना चेन्नईत रंगणार आहे. या सामन्यासाठी काही वर्ष कसोटी क्रिकेटपासून दूर राहिलेल्या रिषभ पंतला देखील संधी देण्यात आली आहे. यासह सरफराज खान आणि केएल राहुलचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.

आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे श्रेयस अय्यरला या संघातून वगळण्यात आलं आहे. यासह ४ वेगवान आणि ४ फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे. बांगलादेशचा संघ नुकताच पाकिस्तानला २-० ने पराभूत करून आला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत होऊ शकते.

पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ (Team India Squad For IND vs BAN 1st Test):

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT