virat kohli saam tv news
Sports

Team India Squad: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! इशान किशनसह प्रमुख गोलंदाज बाहेर

India vs England Team India Squad: सध्या भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका झाल्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे.

Ankush Dhavre

Team India Squad For IND vs ENG Test Series:

सध्या भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका झाल्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून सुरु होणार आहे.

या मालिकेतील भारतीय संघात ३ यष्टीरक्षक फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. ज्यात केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि केएस भरत यांचा समावेश आहे. इशान किशनला या मालिकेतूनही वगळण्यात आलं आहे. तर रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे संघातील मुख्य फलंदाज वरच्या फळीत खेळताना दिसून येतील. तर श्रेयस अय्यरला देखील या संघात स्थान दिलं गेलं आहे. (Latest sports updates)

या फिरकी गोलंदाजांना संघात मिळालं स्थान..

मालिकेतील सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांसाठी कुलदीप यादव, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांना संघात स्थान दिलं गेलं आहे. सामने भारतात असल्यामुळे फिरकी गोलंदाज इंग्लिश फलंदाजांवर वरचढ ठरु शकतात.

यासह हे गोलंदाज फलंदाजीतही मोलाचं योगदान देऊ शकतात. तर वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर मोहम्मद सिराज, मुकेश कुमार,जसप्रीत बुमराह आणि आवेश खान यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार) श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

(Team India’s squad for the first two Tests against England announced)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

SCROLL FOR NEXT