team india saam tv news
Sports

Team India Playing XI: राजकोट कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार! प्रमुख गोलंदाज बाहेर तर हुकमी एक्का करणार कमबॅक

India vs England 3rd Test, Team India Playing XI: मालिकेतील तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळू शकते जाणून घ्या.

Ankush Dhavre

India vs England 3rd Test, Team India Playing XI:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा साामना येत्या १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आणि इंग्लंडवर १०६ धावांनी दमदार विजय मिळवला. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळू शकते जाणून घ्या.

सलामी जोडी..

राजकोट कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. यापूर्वी झालेल्या दोन्ही कसोटीत यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा हे डावाची सुरुवात करताना दिसून आले होते. यशस्वी जयस्वालने विशाखापट्टनमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात २०९ धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारतीय संघाने १०६ धावांनी विजय मिळवला होता.

मध्यक्रम..

राजकोट कसोटीत शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. तर केएल राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. यापूर्वी झालेल्या हैदराबाद कसोटीतही शुभमन गिल तिसऱ्या आणि केएल राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्यात केएल राहुलने ८६ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात त्याला २२ धावा करता आल्या होत्या. दरम्यान पाचव्या क्रमांकावर रजत पाटीदार फलंदाजी करण्यासाठी मैदानावर येऊ शकतो. (Cricket news in marathi)

अष्टपैलू खेळाडू..

या सामन्यात सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. हे दोन्ही खेळाडू गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान देऊ शकतात.

यष्टीरक्षक फलंदाज..

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या राजकोट कसोटीत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएस भरत आठव्या क्रमांकावर खेळताना दिसून येऊ शकतो. त्याने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या दोन कसोटी सामन्यातील ४ डावांमध्ये ४१,२८,१७ आणि ६ धावा केल्या आहेत.

गोलंदाज...

या सामन्यासाठी फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विनला संधी दिली जाणार आहे. त्यामुळे कुलदीप यादवला विश्रांती दिली जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे मुकेश कुमारला बाहेर बसावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT