team india twitter
Sports

PM Modi Meets Team India: पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् टीम इंडियातील खेळाडूंमध्ये काय चर्चा झाली? पाहा VIDEO

PM Modi Meets Team India: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली होती. दरम्यान या खेळाडूंमध्ये काय चर्चा झाली? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारतीय संघ आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकून मायदेशी परतला आहे. मायदेशात भारतीय संघाचं जल्लोषात स्वातग झालं. गुरुवारी सकाळी ६ वाजता भारतीय खेळाडू दिल्ली विमानतळावर पोहोचले. त्यावेळी खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्सने एकच गर्दी केली होती. विमानतळाच्या बाहेर येताच खेळाडूंनी क्रिकेट फॅन्ससह भन्नाट डान्स केला. त्यानंतर या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

नरेंद्र मोदींनी वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना आपल्या निवासस्थानी बोलावलं होतं. त्यानंतर मोदींच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात नरेंद्र मोदींनी भारतीय खेळांडूसोबत काय संवाद साधला हे दाखवण्यात आलं आहे.

कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ' आम्ही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. आम्ही अनेकदा विजय मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. मात्र विजय मिळवू शकलो नव्हतो' तर विराट कोहली म्हणाला की,' विराट कोहली म्हणाला की, 'आम्हा सर्वांना इथे बोलावण्यासाठी खूप खूप धन्यवाद. ही दिवस मी कधीच विसरु शकणार नाही. मला या स्पर्धेत हवं तसं योगदान देता आलं नाही.' तसेच रिषभ पंतबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की,' तुम्ही सर्वांसाठी एक प्रेरणा आहात. तुम्ही एक युद्ध जिंकलं आहे आणि चढउतार हा आयुष्याचा भाग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT