Team India, One Day World Cup 2023  Saam TV
Sports

Team India News : कर्णधार, ओपनिंग, विकेटकीपर...संपूर्ण संघ बेभरवशाचा; १० महिन्यांत कसा जिंकणार वर्ल्डकप?

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा १० महिन्यांवर आलीय. पण भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंची नावंच अद्याप निश्चित झालेली नाहीत.

Nandkumar Joshi

Team India Squad : टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये सेमिफायनलच्या लढतीत टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध मानहानीकारक पराभव झाला. त्यामुळं आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाची संधी पुन्हा हुकली. भारतानं अखेरचं विजेतेपद २०१३ मध्ये पटकावलं होतं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

आता टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं काउंटडाउन सुरू झालं आहे. टीम इंडिया सज्ज असल्याचा दावा केला जात असला तरी, सध्याची परिस्थिती बघता वर्ल्डकपच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अवघा १० महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिली तर, टीम इंडिया वनडे वर्ल्डकप कसा जिंकेल, असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेआधी टीम इंडिया बरेच सामने खेळणार आहे. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविड ज्या पद्धतीनं नवनवे प्रयोग करत आहे, ते बघितलं तर अद्याप टीम इंडिया कशी असेल हे निश्चित झालेले नाही. कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुल हे वारंवार विश्रांती घेत आहेत. केवळ मोठ्या मालिकांमध्ये ते खेळत आहेत. अशावेळी फॉर्ममध्ये सातत्य कसे येईल, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. (Latest Marathi News)

टी २० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा कर्णधार होता. न्यूझीलंडविरुद्ध टी २० मालिकेत हार्दिक पंड्या कर्णधार होता. तर वनडे मालिकेत शिखर धवन कर्णधार आहे. आता बांगलादेश दौऱ्यात पुन्हा रोहित शर्मा हा कर्णधार असेल. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाते. त्यामुळं प्लेइंग कॉम्बिनेशनमध्ये गोंधळ होत आहे, असं म्हटलं जात आहे.

वनडेमध्ये रोहित शर्मा केएल राहुलसोबत सलामीला येईल की शिखर धवन हे अद्याप निश्चित झालेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून वनडेमध्ये हे खेळाडू एकत्र सलामीला खेळलेले नाहीत. मागील काही वनडे मालिकांमध्ये शिखर धवन हा कर्णधारपद भूषवतो आहे. तर रोहित शर्मानं विश्रांती घेतली आहे. अशात रोहित-राहुल-धवन यांच्यात अव्वल ३ खेळाडू निवडणे मोठे जिकिरीचे झाले आहे.  (Sports News)

विकेटकीपर निवडीवरूनही टेन्शन आहे. रिषभ पंत व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये खराब फॉर्मशी झुंज देत आहे. तो सातत्याने अपयशी ठरतोय. त्याला संधी दिली जात आहे. पण त्या संधीचं सोनं त्याला अद्याप करता आलेले नाही. दुसरीकडे संजू सॅमसन, इशान किशन किंवा अन्य खेळाडूंना आजमावलं जात नाही. कसोटीमध्ये पंत मॅच विनर म्हणून सिद्ध झाला आहे. मात्र, वनडे आणि कसोटीत त्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे.

१० महिन्यांवर वर्ल्डकप स्पर्धा कशी जिंकणार?

वनडे वर्ल्डकप स्पर्धा २०२३ मध्ये होणार आहे. या मोठ्या स्पर्धेला आता काही महिनेच उरले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा भारतात होईल. सप्टेंबरपर्यंत टीम इंडियाची घोषणा होईल. आतापर्यंत टीम इंडियाकडे वर्ल्डकपची तयारी करणारे १५ खेळाडूही निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे ते कधी निवडतील, तयारी कधी करतील, आणि अवघ्या १० महिन्यांवर असलेली स्पर्धा जिंकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे अर्थव्यवस्थेला खड्ड्यात? अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद?

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT