Team India Test Sqaud saam tv
Sports

आयपीएलनंतर टीम इंडियात मोठ्या घडामोडी; नव्या प्रशिक्षकाची एन्ट्री, सचिन-गांगुलीसोबत खेळलेल्या दिग्गज क्रिकेटपटूवर जबाबदारी

BCCI Appoints Sairaj Bahutule as India's Spin Bowling Coach : आयपीएलनंतर टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. याआधीच टीम इंडियात मोठी उलथापालथ झाली आहे. संघात नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती झाली आहे.

Nandkumar Joshi

टीम इंडियाला नवा कोच मिळाला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध ६ जूनपासून कसोटी सामना सुरू होणार आहे. त्याआधीच बीसीसीआयने साईराज बहुतुले यांची स्पिन बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी ही घोषणा केली. ५३ वर्षीय साईराज यांनी आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे स्पिन कोच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

साईराज बहुतुले हे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यासोबत खेळले आहेत. महाराष्ट्रात जन्मलेल्या साईराज यांनी १० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. १९९७ ते २००३ या कालावधीत भारतीय संघाकडून दोन कसोटी सामने आणि ८ वनडे सामने खेळले आहेत. साईराज यांच्याकडं देशांतर्गत क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. १८८ प्रथम श्रेणी आणि १४३ लिस्ट ए सामने खेळले असून, १२ टी २० सामन्यांचा अनुभवही गाठिशी आहे.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ६३० विकेट

साईराज बहुतुले यांची भारतीय संघाच्या स्पिन बॉलिंग प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. खेळाडू आणि कोच म्हणून त्यांच्याकडे अनुभव आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि फ्रेंचाइजी क्रिकेटमध्ये स्पिन गोलंदाजीतील गुणवत्ता ओळखून अनेक खेळाडू घडवले आहेत. दोन कसोटी आणि आठ इंटरनॅशनल सामन्यांत त्यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. जवळपास दोन दशकांची प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द आहे, असे बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या साईराज यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६१७६ धावा केल्या असून, ६३० विकेट घेतल्या आहेत. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून त्यांची गणती होतेय, असे कौतुकोद्गारही बीसीसीआयने काढले आहेत. त्यांनी अनेक संघांसाठी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. विदर्भ, केरळ, गुजरात आणि बंगालसारख्या संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

भारतीय क्रिकेट संघात मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर साईराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्पिन बॉलिंग कोच होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. एक खेळाडू म्हणून भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करणं अभिमानास्पद होतं. आता पुन्हा कोचिंगच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूप खास आहे, असे साईराज म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी वाहने अडकली

शिंदेसेना नेत्यांना मातोश्रीचं दार उघडणार? शिंदेसेनेचे नेते राऊतांची ऑफर स्वीकारणार? दोन्ही शिवसेना एकत्र येणार?

राज्यात 81 लाख लाडक्या अपात्र, अपात्र लाडकीकडून कोटींची लूट, सरकारची सूट

Silver Ring Design: चांदीच्या अंगठ्यांनी तुमच्या हातांना मिळेल एस्थेटिक लूक, पाहा अंगठ्यांच्या ७ ट्रेंडी डिझाइन्स

भाजपच्या दिग्गज नेत्याची गळा कापून हत्या; राजकीय वर्तुळाला हादरा

SCROLL FOR NEXT