team india twitter
Sports

ICC T20 WC Team India Timing: सुपर 8 मध्ये टीम इंडियाचे सामने किती वाजता सुरु होतील?

Team India's Timings In ICC T20 World Cup 2024 Super 8 Matches: भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान भारतीय संघाचे सामने किती वाजता सुरु होतील जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. साखळी फेरीत भारतीय संघाने ४ सामने खेळले आहेत. या ४ पैकी ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर १ सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. २० जूनपासून भारतीय संघाचे सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. दरम्यान हे सामने भारतात किती वाजता पाहता येतील? जाणून घ्या.

भारतात किती वाजता सुरु होतील सुपर ८ फेरीतील सामने?

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांचा थरार वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. भारत आणि वेस्टइंडिजमधील वेळेत ९:३० तासांचा फरक आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सामन्यांती वेळ बदलणार का? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. तर भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज अशी आहे की, आयसीसीने भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी योग्य वेळेची निवड केली आहे.

भारतीय संघाचे साखळी फेरीतील सामने न्यूयॉर्कमध्ये खेळले गेले होते. हे सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरु झाले होते. तर भारतीय वेळेनुसार हे सामने रात्री ८ वाजता सुरु झाले होते. सुपर ८ मध्येही भारतीय संघाचे सुपर ८ फेरीतील सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्सला रात्री उशीरापर्यंत किंवा पहाटे लवकर उठून सामने पाहायचे कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

भारतीय संघाचे सामने कोणत्या संघाविरुद्ध?

भारतीय संघाने अ गटातून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचे सुपर ८ फेरीतील सामने बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या ३ संघांमध्ये रंगणार आहे. २० जून रोजी भारतीय संघाचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. तर २२ जून रोजी भारतीय संघाचा दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर २४ जून रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांना मारले, आता फेरीवाले आम्हाला पण मारणार, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महासभेत विनवणी

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT