Team India Twitte/ @ICC
Sports

भारतीय क्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट! वाचा सविस्तर

भारतीय क्रिक्रट संघाच्या चाहत्यांसाठी आज क्रिक्रेटची खास मेजवानी असणार आहे.

वृत्तसंस्था

भारतीय संघ (Team India) जगातील एक ताकदवर क्रिक्रेट संघ म्हणून ओळखला जातो. सध्या भारतीय संघ एकाच वेळी वेगवेगळ्या दौऱ्यावर आहे, एक भारतीय संघ इंग्लंडच्या (India Tour of England) दौऱ्यावर असून एक संघ श्रीलंके (India Tour Of Sri lanka) सोबत मालिका खेळत आहे. आता पर्यंत क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाचे 22 खेळाडू मैदानावर खेळताना दिसणार आहेत. इंग्लंडच्या विरुद्ध कर्णधार पद विराट कोहली (Virat Kohli) सांभाळेल तर श्रीलंकेविरुद्ध शिखर धवन (Shikhar Dhawan) सांभाळेल.

भारतीय क्रिक्रट संघाच्या चाहत्यांसाठी आज क्रिक्रेटची खास मेजवानी असणार आहे. आज चाहत्यांना दोन वेगवेगळे सामने पाहायला मिळणार आहेत. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेचा आज दुसरा सामना दुपारी तीन वाजता सुरु होणार आहे. दुसरीकडे इंग्लंडमध्ये असलेला भारतीय संघ सरावासाठी कांउन्टी संघासोबत सामना खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्ध भारतीस संघ दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करेल, तर दुसरीकडे कांउन्टी सामना खेळून भारताचा कसोटी संघ आपली तयारी मजबूत करेल.

एकाच दिवशी दोन सामने खेळताना दिसणार भारतीय संघ

श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे भारतीय संघ दुसरा सामना खेळणार आहे. दुपारी तीन वाजता क्रिक्रट चाहत्यांना हा सामना पाहता येईल. दुसरा भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध डरहॅममध्ये कांउन्टी सलेक्ट संघासोबत सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 4.30 वाजचा सुरु होणार आहे. हा तीन दिवसीय सामना 22 जुलै रोजी संपणार आहे. श्रीलंकेतील भारतीय संघाने पहिला सामना 7 विकेटने जिंकला होता. ईशान किशन या सामन्यात त्याच्या करियरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता आणि शानदार अर्धशतक ठोकले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT