gautam gambhir twitter
Sports

विराट, धोनीला स्थान; रोहित, बुमराह गायब! पाहा Gautam Gambhir च्या प्लेइंग 11 मध्ये कोण कोण?

Gautam Gambhir Playing XI: गौतम गंभीरने भारताच्या सर्वोत्तम प्लेइंग ११ ची निवड केली आहे. या प्लेइंग ११ मध्ये त्याने रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला स्थान दिलेलं नाही.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने काही दिसवांपूर्वीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. श्रीलंका दौऱ्यावर तो पहिल्यांदा मुख्य प्रशिक्षक म्हणून मैदानात उतरला होता.

दरम्यान आता गंभीरने वर्ल्ड क्रिकेट गाजवणाऱ्या सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड केली आहे. या यादीत त्याने एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांना स्थान दिलंय, मात्र जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि सुनील गावस्कर यांना स्थान दिलेलं नाही.

स्पोर्ट्सकीडाच्या एका व्हिडिओमध्ये गौतम गंभीरने आपल्या ऑल टाइम प्लेइंग ११ ची निवड केली आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह हे भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. मात्र गौतम गंभीरने या दोन्ही खेळाडूंना आपल्या प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं आहे. त्यामुळे फॅन्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

गंभीरने आपल्या प्लेइंग ११ मध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून स्वत:सह वीरेंद्र सेहवागची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड केली आहे. तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्यांनी राहुल द्रविडची निवड केली आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने विराट कोहलीची निवड केली आहे.

गंभीरने सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी त्याने युवराज सिंगची निवड केली आहे. गौतम गंभीर अनेकदा एमएस धोनीच्या विरोधात बोलताना दिसून आला आहे. मात्र आपल्या ऑल टाईम ११ मध्ये गंभीरने धोनीचाही समावेश केला आहे. यासह त्याने या प्लेइंग ११ मध्ये ४ गोलंदाजांना स्थान दिलं आहे. ज्यात आर अश्विन, अनिल कुंबळे, जहीर खान आणि इरफान पठाण यांना स्थान दिलं आहे.

अशी आहे गौतम गंभीरने निवडलेली प्लेइंग ११:

गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, एमएस धोनी, युवराज सिंग, जहीर खान, इरफान पठाण, अनिल कुंबळे, आर अश्विन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT