team india google
Sports

Ind vs Sa 1st Test: टीम इंडियाला अजूनही कमबॅक करण्याची संधी! तिसऱ्या दिवशी करावं लागेल हे काम

India vs South Africa 1st Test: सेंच्युरियनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली

Ankush Dhavre

Team India Comeback Scenario:

सेंच्युरियनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली.

या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २४५ धावा केल्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत दक्षिण आफ्रिकेने ५ गडी बाद २५६ धावा केल्या आहे. आपल्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका खेळत असलेला डीन एल्गर १४० धावांवर नाबाद आहे.

भारतीय संघाला अजूनही कमबॅक करण्याची संधी..

पहिल्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ११ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात अजूनही भारतीय संघाला कमबॅक करण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ही मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गर एक बाजू धरून उभा आहे. भारतीय संघाला जर या सामन्यात कमबॅक करायचं असेल तर, डीन एल्गरला लवकरात लवकर बाद करणं गरजेचं असणार आहे. भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन एल्गरला आपल्या जाळ्यात अडकवू शकतो. त्यामुळे रोहितने तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच आर अश्विनला गोलंदाजीसाठी बोलावलं पाहिजे. असं झालं तर भारतीय संघ या सामन्यात कमबॅक करू शकतो. (Latest sports updates)

सध्या डीन एल्गरला बाद करणं हे भारतीय संघासमोरचं मोठं आव्हान असणार आहे. कारण भारतीय गोलंदाज खालच्या फळीतील फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्यास सक्षम आहेत. मात्र डीन एल्गर टिकून राहिला आणि धावांची आघाडी १०० च्या पुढे गेली तर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

Remedies On Sunday: रविवारच्या दिवशी मीठाचे उपाय करणं ठरेल फायदेशीर; करियरमध्ये लाभ होऊन नकारात्मकता दूर होईल

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कोणता अलर्ट? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT