Cricket News
Cricket News  Saam tv
क्रीडा | IPL

IND vs NZ 2nd T20 : अतितटीच्या सामन्यात टीम इंडियाची न्यूझीलंडवर मात; ६ गडी राखून मिळवला विजय, मालिकेत बरोबरी

Vishal Gangurde

IND vs NZ 2nd T20 : आज भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा दुसरा सामना लखनऊमधील इकाना मैदानात झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम न्यूझीलंडला ९९ रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. त्यानंतर १०० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने सहा गडी राखून न्यूझीलंडवर विजय मिळवला. टीम इंडियाने दुसरा टी-२० सामना जिंकल्याने मालिकेत बरोबरी साधली आहे. (Latest Marathi News)

टी-२० मालिकेचा पहिला सामना भारताने हरल्याने टीम इंडिया मालिकेत १-० ने मागे होती. त्यामुळे विजयाच्या इराद्याने उतरलेल्या टीम इंडियाने (Team india) जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली. टीम इंडियाला पहिला झटका चौथ्या षटकात १७ धावांवर बसला. ब्रेसवेलने शुभमन गिलने फिन अॅलेनला झेलबाद केले. गिल ११ धावांवर बाद झाला.

गिलने दोन चौकार लगावले. तर टीम इंडियाला ४६ धावावर दुसरा झटका बसला. टीम इंडिया ईशान धावबाद झाला. ईशान हा १९ धावांवर बाद झाला. तर टीम इंडियाला ११ व्या षटकात तिसरा झटका बसला. सोढीने राहुल त्रिपाठीला झेलबाद केले. त्रिपाठी केवळ १३ धावा करू शकला. तर वॉशिंग्टन सुंदरने ९ चेंडूत १० धावा केल्या.

त्यानंतर सूर्यकूमार यादव (Suryakumar Yadav) आणि हार्दिक पंड्याने कमान सांभाळली. १७ षटकानंतर टीम इंडियाच्या ८२ धावा झाल्या होत्या. टीम इंडियाला शेवटच्या षटकात ६ धावांची गरज असताना सूर्यकुमारने चौकार ठोकत सामना खिशात टाकला. टीम इंडियाने ६ गडी राखून न्यूझीलंडवर मात केली. टीम इंडियाच्या विजयामुळे मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

SCROLL FOR NEXT