KL Rahul replaces injured Shubman Gill as India’s ODI captain for the South Africa series. saam tv
Sports

Team India Announcement: टीम इंडियाचा कर्णधार बदलला; ODI सीरिजसाठी नव्या संघाची घोषणा

Team India Announcement: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या कर्णधार शुभमन गिलला एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला संधी मिळणार नाही.

Bharat Jadhav

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेसाठी आता टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. या सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आलीय. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्याऐवजी राहुलला ही जबाबदारी देण्यात आलीय. संघाचा कर्णधार गिल कोलकाता कसोटीत जखमी झाला होता, तर उपकर्णधार अय्यर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेदरम्यान जखमी झाला होता आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघात तीन सामन्यांची मालिका रविवार, ३० नोव्हेंबरपासून रांची येथे सुरू होतेय. यावेळी संघाचे नेतृत्त्व राहुल करणार आहे. यष्टीरक्षक-फलंदाज राहुल दोन वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा या फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. , त्याने २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व केले होतं.

ODI सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा

केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि अर्शदीप सिंह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

शिवसेना शिंदे गटाला गळती; बड्या महिला नेत्यानं सोडली साथ, भाजपचं कमळ घेतलं हाती

Maharashtra Live News Update: आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली निवडणुकीच्या रिंगणात

५० ठिकाणी सर्च ऑपरेशन, संशय येऊ नये म्हणून खाजगी गाड्या! पुणे पोलिसांच्या "ऑपरेशन उमरती" ची A to Z स्टोरी

SCROLL FOR NEXT