Tata IPL 2025 Schedule Saam Tv
Sports

IPL चे वेळापत्रक जाहीर, BCCI ची मोठी घोषणा; पहिल्या सामन्यात कोण-कोणाला भिडणार? पाहा टाईम टेबल

Tata IPL 2025 Schedule : बीसीसीआयने काही वेळापूर्वी आयपीएलच्या नव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २२ मार्च पासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेते केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार आहे.

Yash Shirke

Tata IPL 2025 Schedule News : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. यंदाच्या हंगामाला २२ मार्च २०२५ ला सुरुवात होणार आहे. गतविजेते कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या पहिल्या सामन्यात समोरासमोर येणार आहेत. हा सामना ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे.

आयपीएलमध्ये एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. २० मे रोजी क्वालिफायर 1 आणि २१ मे रोजी एलिमिनेटर असे सामने होतील. २३ मे रोजी क्वालिफायर 2 चा सामना खेळला जाईल. आयपीएलच्या अठराव्या हंगामाचा अंतिम सामना २५ मे रोजी ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

स्पर्धेमध्ये २३ मार्चला एमए चिंदबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा मानाचा सामना होणार आहे. त्याच दिवशी हैदराबाद आणि राजस्थानमध्येही सामना रंगणार आहे. २३ मार्चला यंदाच्या हंगामातील पहिला डबल हेडर होईल. आयपीएलच्या एकूण वेळापत्रकानुसार, स्पर्धेच्या ७४ सामन्यांच्या कालावधीत १२ वेळा डबल हेडर सामने होतील.

९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना संपणार आहे. लगेचच १२ दिवसांनी आयपीएलचा सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर लगेचच आयपीएल सुरु होत असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा काळ पर्वणी ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT