fights in cricket  Twitter
Sports

Fight In Cricket: लाईव्ह सामन्यात तुफान राडा! बाद होताच फलंदाजाने रागात फेकली बॅट अन् हेल्मेटच तोडलं -VIDEO

Cricket Fights Video: लाईव्ह क्रिकेट सामन्यात वाद घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Mankading In Cricket: एका फलंदाजासाठी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे फलंदाजी करताना बाद होणं. फलंदाज बाद होताच त्यांना राग अनावर होत असतो.

असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियातील तस्मानियामध्ये सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळाला आहे.

ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तर झाले असे, क्लेरीमाँट आणि न्यू नॉरफॉल्क या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. हा सामना रोमांचक स्थितीत असताना, गोलंदाज हॅरी बूथने फलंदाजी करत असलेल्या क्लेरीमाँट संघातील फलंदाज जेरॉडला धावबाद केलं.( Latest Sports Updates)

फलंदाजी करत असलेला जेरॉड हा चेंडू टाकण्यापूर्वीच क्रिझच्या बाहेर आला होता. याच गोष्टीचा फायदा घेत, हॅरी बूथने मांकडींग करत जेरॉडची विकेट मिळवली. त्यामुळे अंपायरने त्याला बाद घोषित केले.

अंपायरने बाद घोषित करताच फलंदाज संतापात दिसून आला. तो बाहेर जात असताना हेल्मेट आणि बॅट फेकताना दिसून आला. फलंदाज बाहेर जात असताना, संघातील काही खेळाडू मैदानात आले आणि अंपायर सोबत वाद घालू लागले.

ही स्थिती पाहता सामना काही काळ थांबवण्यात आला होता. या सामन्यात क्लेरीमाँट संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात नॉरफॉल्क संघाने प्रथम फलंदाजी करताना २६३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना क्लेरीमाँट संघाला अवघ्या २१४ धावा करता आल्या.

या सामन्यात धावबाद होणारा जेरॉड चांगली फलंदाजी करत होता. तो ४३ धावांवर फलंदाजी करत असताना नॉन स्ट्राइकला बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT