pro kabaddi  saam tv news
Sports

Pro Kabaddi News: तमिळ थलायवाजचा विजयाचा चौकार! यु मुंबा संघावर शानदार विजय

U Mumba vs Tamil Thalaivas: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत तमिळ थलायवाज संघाने यु मुंबा संघावर 50-34 अशा फरकाने पराभव करून चौथ्या विजयाची नोंद केली.

Ankush Dhavre

U Mumba vs Tamil Thalaivas:

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत तमिळ थलायवाज संघाने यु मुंबा संघावर 50-34 अशा फरकाने पराभव करून चौथ्या विजयाची नोंद केली. तमिळ थलायवाज संघाकडून नरेंदर कंडोला(13गुण) व अजिंक्य पवार(10गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यु मुंबाकडून गुमान सिंगने 13गुण, आमीर मोहम्मद जाफर दानिशने 8 गुणांची कमाई केली.

पाटली पुत्र इंडोर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत या लढतीत यु मुंबा संघाने सामन्यात सुरेख सुरुवात करत नरेंदर कंडोला ला बाद केले.पण तिसऱ्याच मिनिटाला तमिळच्या हिमांशु याने सुपर रेड करत संघाला 5-2 अशी आघाडी मिळवून दिली. सातव्याच मिनिटाला तमिळ संघाने यु मुंबा संघावर पहिला लोन चढवून संघाची आघाडी 13-7 ने वाढवली. त्यानंतर मुंबा संघाच्या आमीर मोहम्मद जाफर दानिशने सुपर टॅकल करत संघाची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पूर्वार्धात तमिळ संघाने मुंबाविरुध्द 27-17 अशा फरकाने आघाडी कायम राखली.

उत्तरार्धात देखील तमिळ संघाने आपले वर्चस्व कायम राखले. तमिळ संघाने मुंबा संघावर दुसरा लोन चढवून 31-18अशी भक्कम आघाडी घेतली. 24व्या मिनिटालानरेंदर कंडोलाने आपला सातवा सुपर 10पुर्ण करत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. (Latest sports updates)

सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना तमिळ संघाने आपले आक्रमण अधिक मजबूत केले. मुंबा संघावर तिसरा लोन चढवून तमिळ संघाने आपली आघाडी 46-29 अशी केली. मुंबा संघाकडून अखेरच्या मिनिटाला जय भगवानने सुपर रेड केली. पण तमिळ संघाने आपली आघाडी कायम ठेवत यु मुंबा संघावर 50-34 असा विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

SCROLL FOR NEXT