भारत-श्रीलंका संयुक्तपणे टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन करणार.
7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान 20 संघांची स्पर्धा रंगणार.
जिओस्टारने प्रसारण नाकारल्याच्या बातमीने क्रिकेट विश्वात खळबळ उडालीय.
भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे टी20 विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान होणाऱ्या या मेगा टूर्नामेंटमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. जगभरात क्रिकेट चाहते भारतात पोहोचणार आहेत. या विश्वचषकाबाबत मोठी अपडेट समोर आलीय.
या अपडेटनंतर आयसीसीला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ माजलीय. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओस्टारने २०२६ टी २० विश्वचषकाचे प्रसारण करण्यास नकार दिलाय. या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडालीय.
यानंतर जिओस्टारने अचानक असा निर्णय का घेतला? आणि भारतातील प्रेक्षकांना टी20 विश्वचषकाचे सामने टीव्ही आणि मोबाईलवर लाईव्ह पाहता येणार नाहीत का? असे प्रश्न विचारले जात आहेत. नेमकं जिओस्टारनं का असा निर्णय घेतलाय हे जाऊन घेऊ. द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, २०२७ पर्यंतचा मीडिया करार पुढे चालू ठेवू शकणार नाहीत, असं जिओस्टारने आयसीसीला कळवलंय. कंपनीला प्रचंड आर्थिक तोटा झालाय.
तसेच आयसीसीने २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी मीडिया राइट्स विक्रीची प्रक्रिया सुरू केलीय. आयसीसीला या राइट्समधून अंदाजे २.४ अब्ज डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र जिओस्टारनं अचानक घेतलेल्या या निर्णयाने आयसीसीसमोर मोठं संकट उभे राहिले आहे. २०२३ ते २०२७ साठी जिओस्टारने आयसीसीसोबत तब्बल ३ अब्ज डॉलर्सची डील केली होती.
रिपोर्ट्सनुसार, जिओस्टारने करार संपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयसीसीने नव्या ब्रॉडकास्टिंग पार्टनरच्या शोधाला सुरुवात केलीय. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ यांच्यासह अनेक प्लॅटफॉर्मना लिलावासाठी निमंत्रण पाठवण्यात आलंय. पण कराराची रक्कम मोठी असल्याने कोणत्याही प्लॅटफॉर्मने अद्याप रस दाखवलेला नाहीये. या पार्श्वभूमीवर टी२० विश्वचषक २०२६ चे आयोजन आणि प्रसारणावर संकट निर्माण झालंय. या परिस्थितीमुळे पाहता भारतात विश्वचषकाचे लाईव्ह प्रसारण होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.