T20 World Cup 2024 Aus Vs AFG:  Saamtv
Sports

Pat Cummins Hat-tricks: पॅट कमिन्सचा धमाका! वर्ल्डकपमध्ये सलग दुसरी हॅट्रिक; T20 विश्वचषकात घडवला नवा इतिहास| VIDEO

T20 World Cup 2024 Aus Vs AFG: ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने हॅट्रिक घेत नवा विक्रम केला. याआधी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यातही कमिन्सने हॅट्रिक घेतली घेतली होती. यासोबतच तो विश्वचषकात सलग दोन सामन्यात हॅट्रिक घेणारा पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला आहे.

Gangappa Pujari

टी- ट्वेंटी विश्वचषकातील सुपर आठ फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध- अफगाणिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने हॅट्रिक घेत नवा विक्रम केला. याआधी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यातही कमिन्सने हॅट्रिक घेतली घेतली होती. यासोबतच तो विश्वचषकात सलग दोन सामन्यात हॅट्रिक घेणारा पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला आहे.

टी ट्वेंटी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला अफगाणिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सने पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करत हॅट्रिक मिळवली. पॅट कमिन्सच्या T20 कारकिर्दीतील दुसरी आणि T20 विश्वचषकाच्या इतिहासातील ही 8 वी हॅट्रिक ठरली. विशेष म्हणजे पॅट कमिन्सची हॅट्रिक घेण्याची पद्धतही दोन्ही सामन्यांमध्ये सारखीच होती.

बांगलादेशविरुद्धही त्याने दोन षटकांत हॅट्रिक पूर्ण केलीआणि अफगाणिस्तानविरुद्धही हेच पाहायला मिळाले. बांगलादेशविरुद्धही त्याने 18व्या षटकात दोन बळी आणि २० व्या षटकात एक बळी घेत हॅट्रिक घेतली. या सामन्यातही कमिन्सने 18व्या षटकात हॅट्रिक सुरुवात केली आणि ती 20व्या षटकात पूर्ण केली.

पॅट कमिन्सने केले अनेक रेकॉर्ड!

पॅट कमिन्सने अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्रिक घेत अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सलग 2 हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये बॅक टू बॅक हॅट्रिक घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज आहे.

याशिवाय, टी-20 विश्वचषक 2024 मध्ये हॅट्रिक घेणारा आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेत 2 हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज आहे. अफगाणिस्तानविरुद्ध पॅट कमिन्सची हॅटट्रिक खरोखरच ऐतिहासिक आहे, हे या यशावरुन स्पष्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT