T20 World Cup Pakistan Team  PCB Twitter
Sports

T20 World Cup : पाकिस्तानच्या संघाची घोषणा; खतरनाक फलंदाज बाहेर

फखर जमानला मात्र संघातून वगळण्यात आले आहे.

Satish Daud

T20 World Cup Pakistan Team : येत्या १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाने (pakistan) आपल्या 15 सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली आहे. पाकिस्तानने संघाची कमान बाबर आझमच्या हाती सोपावली आहे. आशिया कपमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या फखर जमानला मात्र संघातून वगळण्यात आले आहे.

नुकतीच विश्वचषक स्पर्धेसाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्ताननं आपल्या संघाची घोषणा केली आहे. त्यातच आता पाकिस्ताननं देखील संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानने आपली फलंदाजी (cricket) आणखीच धारदार बनवण्यास भर दिला आहे. डावखुरा फलंदाज शान मसूदचा संघात समावेश केला आहे. मसूदने या वर्षी इंग्लंडपासून पाकिस्तानपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे त्याने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही. तसेच त्याचा T20 स्ट्राईक रेट फक्त 126 आहे. तो अव्वल फळीतील फलंदाज आहे आणि बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या संथ फलंदाजीमुळे पाकिस्तानी संघ टीकेला सामोरे जात असताना त्याच्यासोबत अशाच आणखी एका खेळाडूची भर पडणे आश्चर्यकारक आहे.

पाकिस्तानचा संघ

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन अफरीदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.

शाहीन आफ्रिदीचे पुरागमन

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीन ज्युनियरचे संघात पुरागमन झालंय. फखर जमानला वगळता पाकिस्तानं बहुतांश खेळाडूंना कायम ठेवले आहे. आशिया चषक स्पर्धेत झमानची कामगिरी अत्यंत खराब होती आणि त्याने हाँगकाँगविरुद्ध केवळ एक अर्धशतक झळकावले होते. त्याचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT