तालिबानचा प्रश्न विचारताच पाकिस्तानी पत्रकार आणि नबी भिडले; पाहा Video  Saam TV
Sports

तालिबानचा प्रश्न विचारताच पाकिस्तानी पत्रकार आणि नबी भिडले; पाहा Video

टी 20 विश्वचषकाचा (T-20 World Cup) 24 वा सामना शुक्रवारी दुबईत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (AFG vs PAK) यांच्यात खेळला गेला.

वृत्तसंस्था

टी 20 विश्वचषकाचा (T-20 World Cup) 24 वा सामना शुक्रवारी दुबईत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (AFG vs PAK) यांच्यात खेळला गेला. अफगाणिस्तानने हा सामना 5 विकेटने गमावला आहे. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत आलेला अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी (Mohmmad Nabi) याला तालिबानशी संबंधित एका पाकिस्तानी पत्रकाराने प्रश्न केला. नबीने पत्रकाराला राजकीय प्रश्न विचारण्यास मनाई केली. तरीही त्यांनी पत्रकाराने न मानता पुन्हा तोच प्रश्न फिरवून विचारला. या प्रश्नानंतर मोहम्मद नबी लगेचच पत्रकार परिषदेतून उठला आणि निघून गेला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की पाकिस्तानी पत्रकार नबीला विचारतात की अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार आले आहे, त्यानंतर अफगाणिस्तानचे पाकिस्तानशी संबंध सुधारले आहेत का? या संबंधांच्या बळकटीकरणातून अफगाणिस्तान संघाला काय बळ मिळेल. यावर नबी म्हणाला की, राजकीय प्रश्न सोडून क्रिकेटबद्दल बोलले तर बरे होईल. आम्ही येथे विश्वचषकासाठी आलो आहोत. विश्वचषकासाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो आहोत. आणि पूर्ण आत्मविश्वासाने आलो आहोत. यानंतर पाकिस्तानी पत्रकार पुन्हा तोच प्रश्न फिरवून विचारतो. यावर नबी म्हणतो की हा क्रिकेटशी संबंधित प्रश्न नाही आणि तो प्रेस कॉन्फरन्समधून निघून जातो.

टी 20 विश्वचषकाचा 24 वा सामना शुक्रवारी दुबईत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना जिंकून स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक केली. त्यांनी अफगाणिस्तानवर 5 विकेट्सने मात केली. बाबर आझमच्या संघाला शेवटच्या दोन षटकात 24 धावा कराव्या लागल्या. असिफ अलीने 19 व्या षटकात करीम जनातच्या चेंडूवर चार षटकार मारून सामना पाकिस्तानच्या गोटात नेला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 बाद 147 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाने 19 षटकांत 5 बाद 148 धावा केल्या. या सामन्यात राशिदने 4 षटकात 26 धावा देत 2 बळी घेतले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT