NZ vs AUS: दोन्ही संघ पहिल्या विजेतेपदासाठी लढणार; NZ चा दिग्गज दुखापतग्रस्त
NZ vs AUS: दोन्ही संघ पहिल्या विजेतेपदासाठी लढणार; NZ चा दिग्गज दुखापतग्रस्त Twitter
क्रीडा | IPL

NZ vs AUS: दोन्ही संघ पहिल्या विजेतेपदासाठी लढणार; NZ चा दिग्गज दुखापतग्रस्त

वृत्तसंस्था

T20 विश्वचषक 2021 (T-20 World Cup) चा अंतिम सामना आज रोजी दुबईच्या मैदानावर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (NZ vs AUS) यांच्यात खेळवला जाणार आहे. यावेळी दोन्ही संघ प्रथमच विजेतेपद पटकावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी ज्या पद्धतीने उपांत्य फेरीचे सामने जिंकले तशीच चमकदार कामगिरी अंतीम सामन्यातही करतील.

या अंतीम सामन्यात न्यूझीलंडचे संघाचे पारडे जड आहे. केन विल्यमसनच्या (Kane Williamson) संघाने यावर्षी कांगारूंविरुद्ध 60 टक्के सामने जिंकले आहेत. या वर्षी दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळले गेले, ज्यामध्ये न्यूझीलंडने 3 जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाला 2 सामने जिंकायला यश आले आहे. दोन्ही संघ ७ मार्चला आमनेसामने आले होते. त्यानंतर न्यूझीलंडने वेलिंग्टनमध्ये 7 गडी राखून सामना जिंकला होता.

ऑस्ट्रेलियाने 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये विक्रमी 5 विश्वचषक जिंकले आहेत, परंतु विशेष म्हणजे त्यांना अद्याप T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे, आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. आता केन विल्यमसनच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली अंतीम सामना जिंकण्याची संधी आहे. त्याची ही पहिलीच टी-20 विश्वचषक फायनल आहे. मागच्या विश्वचषकात इंग्लंडने अंतीम सामन्यात न्युझीलंडचा पराभव केला होता.

ऑस्ट्रेलियाने सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनवर नेहमीच आपले वर्चस्व राखले आहे. तथापि, भारतात झालेल्या 2016 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. उभय संघांमधला विश्वचषकामधील अंतिम सामना 2015 मध्ये झाला होता, जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता, ज्यांनी तेव्हापासून एकही ICC स्पर्धा जिंकलेली नाही.

न्यूझीलंडने साखळी सामन्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. फलंदाजीचही संघाने मोठी कामगिरी केली आहे. मार्टिन गुप्टिलचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मध्ये रेकॉर्ड चांगला आहे. त्याचा सलामीचा जोडीदार डॅरेल मिशेलही चांगला फॉर्ममध्ये आहे. मात्र, कर्णधार केन विल्यमसनकडून मोठ्या खेळीची प्रतीक्षा आहे आणि आज त्याच्याकडून चांगली कामगिरी होण्याची अपेक्षा आहे.

जिमी नीशमने इंग्लंडविरुद्ध मधल्या फळीत आपली योग्यता सिद्ध केली आहे. न्यूझीलंडला डेव्हन कॉनवेची नक्कीच उणीव भासणार आहे. कारण उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याच्या हाताला दुखापत झाली होती. आता त्यांच्या जागी टीम सेफर्टला संधी मिळणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

SCROLL FOR NEXT