Syazrul Idrus  saam tv
Sports

World Record: W, W, W, W, W, W, W...जे कोणालाच नाही जमलं ते 'या' पठ्ठ्याने करून दाखवलं..

7 Wickets In Over: मलेशिया संघातील गोलंदाज सयाजरुल इद्रसने ऐतिहासिक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Syazrul Idrus Record: मलेशियाच्या सयाजरुल इद्रसने बुधवारी मोठा कारनामा केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा गोलंदाज टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ गडी बाद करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. टी-२० वर्ल्डकप आशिया बी पात्रता फेरीतील सामन्यात सयाजरुल इद्रसने हा कारनामा केल्याचे पाहायला मिळाले आहे.

मलेशिया विरुद्ध चीन यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात सयाजरुल इद्रसने ही ऐतिहासिक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

टी- २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सयाजरुल इद्रसचा मोठा रेकॉर्ड..

मलेशिया संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या गोलंदाजाने त्रिफळाचित करत ७ गडी बाद केले आहेत. त्याच्या हवेत फिरणाऱ्या चेंडूंसमोर फलंदाज अडचणीत येत असल्याचे दिसून आले होते. दरम्यान या कामगिरीसह त्याने एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

त्याने मोठ्या विक्रमात नायजेरिया संघातील पीटर अहोला मागे सोडलं आहे. नायजेरिया संघासाठी खेळताना पीटर आहोने २०२१ मध्ये ५ धावा खर्च करत ६ गडी बाद केले होते.

पहिल्यांदाच असं घडलं...

आतापर्यंत एकूण १२ गोलंदाज आहेत ज्यांनी टी -२० क्रिकेटमध्ये ६ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. भारतीय संघाकडून दीपक चाहर युजवेंद्र चहल, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एश्टन एगर आणि श्रीलंकेचा फिरकीपटू अजंता मेंडिसचा समावेश आहे.

मात्र कोणालाही ७ गडी बाद करता आले नव्हते. सयाजरुल इद्रसच्या या कामगिरीच्या जोरावर मलेशियाने चीनवर ८ गडी राखून विजय मिळवला. (Latest sports updates)

एकट्यानेच संपवला चीनचा डाव..

सयाजरुल इद्रसने एकट्यानेच चीनचा संपूर्ण डाव संपवला. त्याने या डावातील ७ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. या कामगिरीच्या बळावर विरोधी संघाचा डाव १२ व्या षटकात २३ धावांवर संपुष्टात आला.

या धावांचा पाठलाग करताना मलेशिया संघाने सुरूवातीला २ विकेट्स गमावले. मात्र आव्हान सोपं असल्याने मलेशिया संघाने पाचव्या षटकात विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghantali hi Tutena: समर-स्वानंदी गेले नाटक पाहायला; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये स्वप्नील जोशीची एन्ट्री

Commonwealth Games 2026: 36 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! भारतीय ज्युडोपटूंचा इतिहास; अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांची सुवर्णपदकाची कमाई

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

BJP: मोठी बातमी! भाजपला मोठा हादरा, आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT