swapnil kusale saam tv
क्रीडा

Swapnil Kusale: स्वप्नील कुसळेने ज्या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकलं, ते रायफल 3 पोझिशन नेमकं काय?

Ankush Dhavre

महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिसमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन शूटिंग प्रकारात त्याने कांस्यपदकावर निशाणा साधला आहे. या प्रकारातील अंतिम फेरीत तो तिसऱ्या स्थानी राहिला. त्यामुळे तो कांस्य पदकाचा मानकरी ठरला आहे.

नेमबाजीत भारताला तिसरं पदक

पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी शानदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय नेमबाजांनी शूटींग प्रकारात आतापर्यंत ३ पदकं जिंकली आहेत. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदका पटकावलं होतं. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी मिळून कांस्यपदकावर निशाणा साधला.पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताने शूटिंगमध्ये मिळवलेलं हे दुसरं पदक ठरलं होतं. आता स्वप्नील कुसळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन शूटिंग प्रकारात कांस्यपदक जिंकलंय. हे भारताचं शूटींगमधलं तिसरं पदक ठरलं आहे.

काय आहे ५० मीटर रायफल थ्री पोझिशन शूटिंग प्रकार?

या प्रकारात पिस्तूल ऐवजी रायफलचा वापर केला जातो. या प्रकाराचं नाव रायफल थ्री पोझिशन शूटिंग असं आहे. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की, या प्रकारात ३ पोझिशनचा वापर केला जातो.

३ प्रकारे केलं जात शूट

शूटरला एकाच टार्गेटला ३ वेगवेगळ्या पोझिशनमध्ये शूट करावं लागतं. पहिली पोझिशन म्हणजे निलिंग पोझिशन. या पोझिशनमध्ये शूटरला गुडघ्यावर बसून शूट करावं लागतं. दुसरी पोझिशन म्हणजे प्रोन पोझिशन. या पोझिशनमध्ये शूटरला पोटावर झोपून शूट करावं लागतं. तिसरी आणि शेवटची पोझिशन म्हणजे स्टँडींग पोझिशन. या पोझिशनमध्ये शूटरला उभं राहून शूट करावं लागतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT