सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतंच टी-२० वर्ल्डकप जिंकला आणि आशिया कपचे विजेतेपदही पटकावलं. मात्र रिपोर्ट्सनुसार, सूर्याकडून टी-२० चं कर्णधारपद जाणार आहे. आयपीएल २०२६ नंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी-२० सिरीज खेळणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआय काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा विचार करतंय. यावेळी टी-२० च्या कर्णधाररदाची धुरा श्रेयस अय्यरवर सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादव जवळपास दोन वर्षांपासून टी-२० टीमचा कर्णधार आहे. रोहित शर्माच्या टी-२० निवृत्तीनंतर २०२४ मध्ये त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार, सूर्याचं कर्णधारपद जाण्याच्या मार्गावर आहे. टीम इंडियाचं भविष्य लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण नवा कर्णधार होण्याच्या शर्यतीत श्रेयस अय्यर आघाडीवर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर टीममध्ये परतणार असून त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं. ३१ वर्षीय अय्यरने त्याचा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना ३ डिसेंबर २०२३ रोजी खेळला होता. याचा अर्थ, तो दोन वर्षांहून अधिक काळ एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आता भविष्याचा विचार करता निवड समिती अय्यरला नवीन कर्णधार म्हणून निवडू शकते.
दरम्यान केवळ श्रेयस अय्यर नाही तर अजून दोन खेळाडूंच्या नावाची कर्णधारपदासाठी चर्चा होतेय. यामध्ये संजू सॅमसन आणि इशान किशन यांची नावं आहेत. टी-२० वर्ल्डकप आणि सुरु असलेल्या आयपीएलमध्ये संजूने चांगली कामगिरी केलीये. त्याचप्रमाणे सध्या टी-२० उपकर्णधार अक्षर पटेलचंही नाव देखील चर्चेत आहे.
भारताने नुकताच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-२० वर्ल्डकप जिंकला. हे लक्षात घेता त्याला टीममधून लगेच वगळलं जाणार नाही. निवड समिती आयपीएल २०२६ नंतर नवीन कर्णधाराची निवड करू शकते. टीम इंडिया आयर्लंडमध्ये दोन टी-२० सामने खेळेल त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० सिरीज खेळणार आहे. यामध्ये सूर्याची टीममध्ये निवड केली जाऊ शकते.
श्रेयस अय्यरबद्दल बोलायचं झाल्यास त्याने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला होता. त्यापूर्वी २०२० मध्ये अय्यरने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. २०२५ मध्ये त्याने पंजाब किंग्सला अंतिम फेरीत पोहोचवलं. तर अय्यरच्या कर्णधारपदाखाली पंजाब किंग्सने चांगली कामगिरी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.