Suryakumar Yadav Indian Test Team 
Sports

Suryakumar Yadav: टी-२० चं कर्णधारपद मिळूनही सूर्याची एक इच्छा अपूर्णच, म्हणाला, मलाही भारतासाठी...!

Suryakumar Yadav Indian Test Team: टी-२० वर्ल्डकपनंतर रोहित शर्माने टीम इंडियाची कमान सोडली आणि या जागी सूर्यकुमार यादवची नियुक्ती करण्यात आली. मात्र असं असून देखील एक इच्छा अपूर्ण राहिली असल्याचं सूर्याने सांगितलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीम इंडियाच्या टी-२० फॉर्मेटचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची नियुक्ती करण्यात आली. श्रीलंकेविरूद्धच्या सीरीजमध्ये सूर्याने या फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं आणि भारताला सीरीज देखील जिंकवून दिली. टी-२० वर्ल्डकपनंतर रोहित शर्माने टीम इंडियाची कमान सोडली आणि या जागी सूर्यकुमार यादवची नियुक्ती करण्यात आली. मात्र असं असून देखील एक इच्छा अपूर्ण राहिली असल्याचं सूर्याने सांगितलं आहे.

सूर्याकुमार यादवच्या म्हणण्यानुसार, त्याला भारताच्या टेस्ट टीममध्ये स्थान मिळवायचं आहे. टेस्ट टीममध्ये जागा मिळवण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याचे सांगितलंय. इतकंच नाही तर सूर्याने सांगितलं की, टेस्ट टीममध्ये सामील होणं आपल्या हातात नाही, पण देशांतर्गत स्पर्धा खेळणं हे माझ्या हातात असल्याने मी हा निर्णय घेणार आहे.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सूर्या म्हणाला की, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना टेस्ट टीममध्ये आपलं स्थान मिळण्यासाठी कठोर परिश्रम घेतलं आहेत. त्याचप्रमाणे मलाही देखील टेस्ट टीममध्ये स्थान मिळवायचे आहे. जेव्हा मी भारतासाठी टेस्ट टीममध्ये डेब्यू केला तेव्हा मी दुखापतीमुळे बाहेर पडलो. ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांनी चांगली कामगिरी केली.

सूर्यकुमार पुढे म्हणाला की, जर पुढे जाऊन मला या फॉर्मेटमध्ये खेळायचं आहे तर ते माझ्या हातात नाही. आता सध्या माझ्या हातात बुची बाबू, दुलिप ट्रॉफी आहे, त्यामुळे चांगला खेळ करायचा आहे.

येत्या ५ सप्टेंबरपासून दुलिप ट्रॉफिला सुरुवात होणार आहे. या सिरीजमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार आहे. दुलीप ट्रॉफीपूर्वी सूर्या मंगळवारी कोईम्बतूरमध्ये येथे TNCA XI विरुद्ध बुची बाबू स्पर्धेत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळताना दिसणार आहे.

सूर्याचा टेस्ट डेब्यू

सूर्याने 2023 मध्ये टीम इंडियाकडून टेस्ट टीमसाठी डेब्यू केलं होतं. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा सामना खेळला होता. यावेळी त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

SCROLL FOR NEXT