pat cummins yandex
Sports

SRH Retain Player: हैदराबादचं ठरलं! या खेळाडूंना करणार रिटेन; कमिन्स नव्हे, तर या खेळाडूला 23 कोटी देणार

IPL 2025, Sunrisers Hyderabad Retain Players List: आगामी हंगामात सनराझर्स हैदराबादचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करु शकतो, जाणून घ्या.

Ankush Dhavre

Sunrisers Hyderabad: आयपीएल फ्रेंचायझींची डोकेदुखी वाढणार आहे. कारण येत्या काही दिवसात सर्व फ्रेंचायझींचीना आपले रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहे. सनरायझर्स हैदराबादने तयारी देखील सुरू केलीये.

ज्यात दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज हेनरिक कलासेनचे नाव आघाडीवर आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सनरायझर्स हैदराबादचा संघ क्लासेनला २३ कोटी रुपयांत रिटेन करू शकतो. यासह कर्णधार पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांना देखील रिटेन केले जाऊ शकते.

सनरायझर्स हैदराबाद संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे या संघाची संघमालक काव्या मारन समोर, कोणाला रिटेन करायचं असा प्रश्न असणार आहे. ईएसपीएन क्रीकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, काव्या मारन ट्रेविस हेड आणि कर्णधार पॅट कमिन्सला १८ कोटी रुपयांत रिटेन करू शकते.

तर भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीला देखील रिटेन केले जाऊ शकते. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहेत.

आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी

सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलिस्ट संघ आहे. दमदार कामगिरी करत या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलमध्ये या संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

गेल्या हंगामात पॅट कमिन्स या संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना या संघाने दमदार कामगिरी केली होती. संपूर्ण स्पर्धेत या संघाचा दबदबा पाहायला मिळाला होता. मात्र फायनलमध्ये या संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

सर्व फ्रेंचायझींना खेळाडूंवर बोली लावण्यासाठी १२० कोटींचा पर्स दिला जाणार आहे. तर खेळाडूंना रिटेन करण्यासाठी ७५ कोटी रुपये असणार आहेत. सर्व फ्रेंचायझी त्यांना वाटेल तसं ७५ कोटी खर्च करु शकतात. तर आयपीएलने ठरवून दिलेल्या स्लॅबनूसार, पहिला खेळाडू १८ कोटी, दुसरा खेळाडू १४ कोटी आणि तिसरा खेळाडू ११ कोटी रुपयांत रिटेन करता येऊ शकतो. तर २ अन्कॅप्ड खेळाडूंना ४ कोटी रुपयात रिटेन करता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT