Sunil Gavaskar saam tv
Sports

Indian Cricket Team : सुनील गावस्कर संतापले; म्हणाले, हे गंभीरचे तळवे चाटण्यासारखं....!

Indian Cricket Team: टीम इंडियाच्या चांगल्या कामगिरीचं संपूर्ण श्रेय गौतम गंभीरला मिळतंय. मात्र माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना हे फारसं पडलेलं नसून ते यावर संतापले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडिया सध्या बांगलादेशाविरूद्ध टी-२० सिरीज खेळतेय. यावेळी पहिल्या टी-२० सामन्यामध्ये भारताने बांगलादेशाचा पराभव केला. दरम्यान टी-२० सिरीजपूर्वी भारताने टेस्ट सिरीजही २-० ने जिंकली. कोच पदाचा कार्यभार सांभाळताच टीम इंडिया चांगली कामगिरी करताना दिसतेय. त्यामुळे या यशाचं संपूर्ण श्रेय गौतम गंभीरला देण्यात देतंय. मात्र माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना हे फारसं पडलेलं नसून ते यावर संतापले आहेत.

टीम इंडियाने ३ दिवसांत जिंकला सामना

भारताने बांगलादेशाविरूद्ध २ टेस्ट सामने खेळले आणि जिंकले देखील. टीम इंडियाने कानपूर टेस्ट सामना अवघ्या तीन दिवसात जिंकला. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ 35 ओव्हर्स खेळले गेले. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ झालाच नाही. असं असतानाही भारताने आक्रमक पद्धतीनेचौथ्या आणि पाचव्या दिवशी शानदार खेळ करत सामना जिंकला. अनेक जण या विजयाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना देतायत. मात्र यावर सुनील गावस्कर संतापले.

ही सर्वोत्तम दर्जाची चाटूगिरी

'स्पोर्टस्टार'च्या एका कॉलममध्ये गावस्कर यांनी कानपूर टेस्ट सामन्यात भारताच्या रणनीतीचं श्रेय गंभीरला मिळाल्याबद्दल निराशा व्यक्त केलीये. गावस्कर यांनी गंभीरला श्रेय देणाऱ्या लोकांना 'तळवे चाटणारे' असं संबोधलं आहे.

गावस्कर म्हणाले की, 'आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलंय की, रोहित आक्रमक फलंदाजी करतो. शिवाय तो आपल्या टीमलाही असं करण्यास प्रोत्साहित करतोय. गंभीरला प्रशिक्षण देऊन काही महिनेच झालेत. त्यामुळे त्याला याचं श्रेय देणं ही ही सर्वोत्तम दर्जाची चाटूगिरी आहे.

विजयाचं श्रेय केवळ रोहितला

गावस्कर पुढे म्हणाले की, बेन स्टोक्स आणि ब्रँडन मॅक्युलम यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे बदलेली दिसली. पण गंभीरने मॅक्कुलमसारखी फलंदाजी फार क्वचितच केली असेल. टीम इंडियाच्या विजयाचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते फक्त रोहितलाच जातं, बाकी कोणालाच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम तो ठहरे परदेसी' गाण्याचे गीतकार झहीर आलम यांचे निधन; ३ हजार रुपयांमध्ये लिहिलं होतं लोकप्रिय गाणं

तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यात मोठी भर; दोन वर्षांत ४९ किलो सोनं दान|VIDEO

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, ४ दिवसांपूर्वी झाली होती निवड; राजकीय घडामोडींना वेग

Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Maharashtra News Live Update: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT