steve smith twitter
Sports

Steve Smith Record: स्मिथने रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये केली ब्रायन लारा अन् सुनील गावसकरांची बरोबरी

IND vs AUS 4th Test, Steve Smith Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात स्मिथने शतकी खेळी करत मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथला सुर गवसला आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर आता चौथ्या कसोटीतही त्याने दमदार शतकी खेळी केली आहे.

स्मिथने या डावात एकतर्फी फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकीर्दीतील ३४ वे शतक झळकावले आहे. या दमदार खेळीच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे. दरम्यान त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

ब्रायन लाराच्या रेकॉर्डची केली बरोबरी

स्टीव्ह स्मिथची बॅट चांगलीच तळपली आहे. या सामन्यात शतकी खेळी करत त्याने ब्रायन लारा आणि सुनील गावसकरांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. हे स्टीव्ह स्मिथच्या कसोटी कारकिर्दीतील ३४ वे शतक ठरले आहे.

यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत वेस्टइंडिजचे दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आणि सुनील गावस्कर यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. या दोन्ही दिग्गज फलंदाजांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ३४-३४ शतकं झळकावण्याची नोंद आहे. यासह माजी फलंदाज महेला जयवर्धने आणि युनूस खान यांच्या नावे देखील कसोटीत ३४-३४ शतकं झळकावण्याची नोंद आहे.

१) सचिन तेंडुलकर (भारत) - ५१ शतक

२) जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - ४५ शतक

३) रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - ४१ शतक

४) कुमार संगकारा (श्रीलंका) - ३८ शतक

५) जो रूट (इंग्लंड) - ३६ शतक

६) राहुल द्रविड़ (भारत) - ३६ शतक

७) स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - ३४ शतक

८) यूनुस खान (पाकिस्तान) - ३४ शतक

९) सुनील गावस्कर (भारत) - ३४ शतक

१०) ब्रायन लारा (वेस्टइंडीज) - ३४ शतक

११) महेला जयवर्धने (श्रीलंका) - ३४ शतक

ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी योग्य ठरवला. डावाची सुरुवात करताना कॉन्टासने शानदार अर्धशतकी खेळी केली.

त्यानंतर लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा यांनी देखील अर्धशतकं झळकावली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक १४० धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्ड्रिंक प्यायल्याने ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली; निरखून पाहिलं तर आढळला कचरा, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्रकरणी सर्वात मोठी कारवाई,DGCA ची व्हीएसआरच्या विमान उड्डाणावर बंदी

Wednesday Horoscope : मनासारखा दिवस जाईल, डोके शांत ठेवून काम कराल; ५ राशींच्या लोकांचं नशीब पालटणार

Digital Arrest: फोन आला, कोणी व्हिडिओ कॉल केला तर काय कराल? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला बचावाचा मार्ग

T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

SCROLL FOR NEXT