team india 
Sports

KL Rahul: गुड न्यूज! भारताच्या स्टार खेळाडूच्या घरी पाळणा हलणार; पोस्ट शेअर करत दिली माहिती

KL Rahul- Athiya Shetty: भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने पोस्ट शेअर करत गोड बातमी दिली आहे.

Ankush Dhavre

kl Rahul News In Marathi: भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या आपल्या फ्लॉप फलंदाजीमुळे चर्चेत आहे. न्यूझीलंडविरुद्ध फ्लॉप झाल्यानंतर तो ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध अनधिकृत कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे.

मात्र इथेही त्याचा फ्लॉप शो सुरुच आहे. सुरुवातीच्या दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला आहे. मात्र यावेळी तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या तुफान चर्चेत आहे.

राहुल आणि अथियाने ८ नोव्हेंबरला एक पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्सला गुड न्यूज दिली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये, our beautiful blessing coming soon..' असं लिहिलं आहे. लवकरच दोघांमध्ये आता तिसऱ्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. दोघेही २३ जानेवारी २०२३ ला विवाह बंधनात अडकले होते.

पहिल्या कसोटीत ओपनिंगला येणार?

केएल राहुल सध्या ऑस्ट्रेलियात आहे. तो ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध सुरू असलेल्या अनधिकृत कसोटी मालिकेत भारतीय ए संघाचं प्रतिनिधित्व करतोय. मात्र पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.

या सामन्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे. २२ नोव्हेंबरपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा नसणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे केएल राहुलला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली जाऊ शकते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नसणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालसोबत केएळ राहुलला सलामीला संधी मिळण्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT