Cristiano Ronaldo News Updates, Cristiano Ronaldo Son Died Saam Tv
Sports

स्टार फुटबॉलर रोनाल्डोच्या नवजात मुलाचे निधन, ट्वीट करत दिली माहिती

रोनाल्डोची प्रेसयी जॉर्जियाने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यातील एका बाळाचा मृत्यू झाला.

वृत्तसंस्था

प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोनाल्डोच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. रोनाल्डोने ट्विट करून ही माहिती दिली आहे. यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. रोनाल्डोची प्रेसयी जॉर्जियाने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यातील एका बाळाचा मृत्यू झाला. (Cristiano Ronaldo News Updates)

हे देखील पहा -

ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या ट्विट मध्ये लिहले आहे की, आम्हाला अत्यंत दु:खाने कळवावे लागते की आमच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. आमच्या वेदना फक्त आई-बाबा झाले आहेत, त्यांनाच कळू शकतात. आआमच्या मुलीचा जन्म हा आम्हाला हे दु:ख सहन करण्याची ताकद देतो. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही सर्व डॉक्टरांचे आभार मानतो ज्यांनी आमची मदत केली.' क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना यांनी दोघांनी हॉस्पिटलमधील एक फोटोही शेअर केला आहे. या दोन मुलांच्या प्रसूतीवेळी मुलाचा मृत्यू झाला आहे, तर मुलगी सुखरूप आहे.

मुलगा आमचा देवदूत होता, आम्ही त्याच्यावर कायम प्रेम करू असे देखील रोनाल्डोने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ऑक्टोबरमध्ये रोनाल्डोने जॉर्जिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ते लवकरच आई- बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनी ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की ते जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. रोनाल्डोला 11 वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर, चार वर्षांची इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं तर तीन वर्षांची अलाना मार्टिन अशी चार मुलं आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे यांची एकत्रित चौकशी

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT