Srilanka sqaud announced for icc t20 world cup wanindu hasaranga named as captain amd2000 twitter
Sports

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर! या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

Srilanka Squad, T20 World Cup: आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी जवळपास सर्वच संघांनी आपले स्क्वॉड जाहीर केले आहेत. नुकताचत श्रीलंकेने आपल्या स्क्वॉडची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी श्रीलंकेने आपल्या प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. या स्पर्धेत वानिंदू हसरंगा श्रीलंकेचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी चरीथ असलंकाकडे सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच महिश थिक्षणा आणि मथिशा पथिराणासारख्या युवा खेळाडूंना देखील या संघात स्थान देण्यात आलं आहे.

आगामी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

वानिंदु हसरंगा (कर्णधार), चरिथ असलंका (उपकर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदु मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महीश थिक्षणा, डुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथिशा पथिराना आणि दिलशान मदुशंका

या संघात फलंदाज म्हणून चरिथ असलंका, कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदु मेंडिस, सदीरा समरविक्रमा यांना स्थान देण्यात आलं आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा आणि वानिंदु हसरंगा यांना स्थान देण्यात आलं आहे. तर गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी , महीश थिक्षणा, डुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथिशा पथिराना आणि दिलशान मदुशंका यांच्यावर असणार आहे.

आगामी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या २ जूनपासून प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन्ही देशांमध्ये संयुक्तरित्या पार पडणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे तर बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT