SRI LANKA CRICKET TEAM TWITTER
Sports

WTC Points Table: इंग्लंडने मालिका जिंकली, पण 1 सामना जिंकून श्रीलंकेने या तगड्या संघांचे टेन्शन वाढवले

WTC Points Table, ENG vs SL: इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकेत इंग्लंडने विजय मिळवला. मात्र १ सामना जिंकून इंग्लंडने WTC फायनलमध्ये मोठी झेप घेतली आहे.

Ankush Dhavre

श्रीलंकेने अखेर करून दाखवलं. ओव्हलच्या मैदानावर खेळताना श्रीलंकेने इंग्लंडला ८ गडी राखून धूळ चारली आहे. या विजयासह श्रीलंकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. हा सामना जिंकत श्रीलंकेने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला दे धक्का देत टॉप ५ मध्ये प्रवेश केला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील तिसऱ्या हंगामात श्रीलंकेलाही फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. श्रीलंकेने आतापर्यंत ३ सामने जिंकले आहेत. या संघाची विजयाची सरासरी ही ४२.८६ टक्के इतकी आहे.

तर दुसरीकडे इंग्लंडने आतापर्यंत १६ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ८ सामने जिंकता आले आहेत. या संघाची विजयाची सरासरी ही ४२.१९ इतकी आहे. या पराभवासह इंग्लंडचा संघ सहाव्या स्थानी सरकला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ३८.८९ टक्के विजयाच्या सरासरीसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

श्रीलंका फायनलमध्ये जाणार का?

श्रीलंकेने हा सामना जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. मात्र फायनलमध्ये पोहचण्यासाठी या संघाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण श्रीलंकेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचं आहे त्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची आहे. त्यामुळे फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मुळीच सोपा नसणार आहे. जर फायनलमध्ये जायचं असेल, तर श्रीलंकेला या बलाढ्य संघांना पराभूत करावं लागेल.

भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघ या यादीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

श्रीलंकेचा शानदार विजय

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३२५ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २६३ धावांवर आटोपला. मात्र दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाज केली इंग्लंडचा डाव १५६ धावांवर संपुष्टात आणला. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी २१९ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य श्रीलंकेने ८ गडी राखून पूर्ण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

Historical Places : पर्वतरांगांच्या सान्निध्यात अन् नद्यांच्या संगमावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासातील अनोखा जलदुर्ग

उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

Bigg Boss Marathi 6 : खानदेशच्या किंगची बिग बॉसच्या घरातून Exit, सचिन कुमावतच्या शॉकिंग एलिमिनेशनमुळे चाहते नाराज

SCROLL FOR NEXT